शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

व्हॅक्सीन घेऊन जगभरात जाणारी विमानं रिकामी येत नाहीत; जाणून घ्या, काय म्हणाले पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 13:47 IST

आपण योगाला ज्या पद्धतीने संपूर्ण जगभर पसरवले त्याच पद्धतीने आपण सर्वजण एकत्रितपणे तृणधान्यही (भरड) संपूर्ण जगात पोहोचवू शकतो. (Narendra Modi address webinar on budget )

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जी विमानं व्हॅक्सीनचे लाखो डोस घेऊन जग भरात जात आहेत, ती रिकामी येत नाहीत. ते आपल्या सोबतीने भारताप्रति विश्वास आत्मीयता, स्नेह, आशीर्वाद आणि एक भावनात्मकता घेऊन येत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. ते बजेटमधील डीपीआयआयटीशी संबंधित घोषणांसंदर्भात एका वेबिनारला संबोधित करत होते. (Narendra Modi address webinar on budget announcement related to dpiit niti aayog after corona situation vaccine supply to abroad)

व्हॅक्सीन प्रमाणेच भारतातील तृणधान्यही उपयोगी - पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात संयुक्त राष्ट्रांकडून 2023 हे 'International Year of Millets 2023' घोषित केल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, भारताच्या या प्रस्तावाचे 70 हून अधिक देशांनी समर्थन केले आहे. मोदी म्हणाले, आपण योगाला ज्या पद्धतीने संपूर्ण जगभर पसरवले त्याच पद्धतीने आपण सर्वजण एकत्रितपणे तृणधान्यही (भरड) संपूर्ण जगात पोहोचवू शकतो. ज्या पद्धतीने कोरोनापासून वाचविण्यासाठी मेड इन इंडिया व्हॅक्सीन आहे. त्याच पद्धतीने लोकांना आजारी पडण्यापासून वाचविण्यासाठी भारतात तयार होमारे तृणधान्यही तेवढेच उपयोगी आहे.

जवळपास 520 बिलियन डॉलर्सचे उत्पादन होण्याची आशा -पंतप्रधान मोदी म्हणाले, या वर्षीच्या अर्थसंकल्पात PLI स्किमशी संबंधित योजनांसाठी जवळपास 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उत्पन्नाच्या सरासरी 5 टक्के इंसेंटिव्हच्या स्वरुपात देण्यात आले आहेत. केवळ पीएलआय स्कीमच्या सहाय्यानेच येणाऱ्या पाच वर्षांत जवळपास 520 बिलियन डॉलरचे उत्पादन भारतात होण्याची शक्यता आहे.

देशातील लोकांना लस मिळत नाही आणि तुम्ही इतर देशांना देताय -यातच, दिल्ली उच्च न्यायालयाने, देशातील नागरिकांना लस मिळत नसताना तुम्ही ती अन्य देशांना का देत आहात. लसनिर्मितीच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर का करत नाही, असा सवाल सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेकला विचारला आहे. याच बरोबर, कोरोना लसीकरणासाठी वर्गिकरण करण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल केंद्र सरकारला विचारला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या