शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

शेतकऱ्याची नेत्रदिपक भरारी! 700 झाडांच्या बागेतून दरवर्षी मिळतंय 30 लाख रूपयांचं उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 14:59 IST

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तरूणांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

शाजापूर : मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तरूणांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. या शेतकऱ्याने आवळा सारखी औषधी शेती करून गरिबीवर मात केली. शेतकरी मनोज नरेलिया यांनी शेती हा एक फायदेशीर व्यवसाय असल्याचे दाखवून दिले आहे. आवळ्याच्या शेतीतून त्यांना दरवर्षी लाखो रुपयांचा नफा मिळत आहे. नरेलिया या शेतकऱ्याने 20 वर्षांपूर्वी सुनेरा गावाजवळ 15 एकर जमिनीत आवळ्याची बाग लावली होती, 5 वर्षानंतर या झाडांना फळे येऊ लागली. सध्या या बागेत जवळपास 700 झाडे आहेत, ज्यावर आवळ्याची फळे येतात. यंदाही आवळ्याचे बंपर उत्पादन झाले असून भरघोस नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

आवळा हे पीक नोव्हेंबर महिन्यात जवळजवळ तयार होते आणि डिसेंबरपर्यंत ते मोठ्या व्यापाऱ्यांमार्फत विकत घेऊन प्रसिद्ध आयुर्वेद औषध कंपन्यांपर्यंत पोहोचवले जाते. नरेलिया यांनी सांगितले की, पीक तयार होताच दरवर्षी उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील व्यापारी शेतात येतात आणि संपूर्ण बागेचा व्यवहार करतात. साधारणपणे इथला आवळा यूपी आणि हरिद्वारला पुरवला जातो. 

मेहनत कमी आणि नफा जास्तनरेलिया या शेतकऱ्याने त्याच्या यशाचा मार्ग सांगताना म्हटले, आवळ्याची शेती करताना फारसा खर्च येत नाही. एकदा रोप लावले की फक्त त्याची काळजी घ्यावी लागते. फक्त पाणी आणि ठरावीक गोष्टींची काळजी आवश्यक असते. मात्र, इतर पिकांना जास्त श्रम आणि खर्च करावा लागतो. या बागेतून दरवर्षी 20 ते 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु यावेळी देशातील इतर भागात आवळ्याचे अधिक उत्पादन झाल्याने भाव थोडा कमी आहे. 

लक्षणीय बाब म्हणजे आवळा ही एक औषधी वनस्पती आहे. खरं तर कोरोना काळापासून आवळ्याची मागणी वाढली आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई यासह अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हिवाळ्यात याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे आगामी काळात देखील याची मागणी वाढेल अशी नरेलिया या शेतकऱ्याला अपेक्षा आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी