शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Narco Terrorism: रात्रीच्या अंधारात भारतात घुसण्याचा प्रयत्न; एकाचा एनकाउंटर दोघांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 20:39 IST

जवानांनी या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले आहेत.

Pakistani Terrorist Arrested by Indian Army: पाकिस्तानकडूनभारतात सातत्याने नार्को टेररिझमला प्रोत्साहन दिले जात आहे. पाकिस्तानातून अनेकदा ड्रोनद्वारे किंवा लोकांच्या माध्यमातून भारतात घुसखोरी केली जात आहे. पण प्रत्येकवेळी भारतीय लष्करही हे प्रयत्न हाणून पाडत आहेत. आता पुन्हा एकदा भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले आहे. 

यावेळी इतर दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडले असून, त्यांच्याकडून ड्रग्जची मोठी खेपही जप्त करण्यात आली आहे. लष्कराने जिवंत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाच्या पायातही गोळी लागली आहे. पाकिस्तानने काल रात्री तिन्ही घुसखोरांना भारतीय हद्दीत पाठवले होते. मात्र लष्कराच्या सतर्क जवानांनी घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. दोन्ही दहशतवादी पीओकेचे रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.

पहाटे 2.15 वाजता ते घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, पहाटे 2.15 च्या सुमारास तीन दहशतवादी शाहपूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत होते. नियंत्रण रेषेवर पहारा देणाऱ्या लष्कराच्या जवानांनी या दहशतवाद्यांना सीमेवर प्रवेश करताना पाहिले तेव्हा त्यांनी लगेच गोळीबार केला. या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला, तर दुसऱ्याच्या पायाला गोळी लागली. दोन्ही दहशतवादी पळून गेले. पण अखेर लष्कराने दोघांनाही अटक केली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतIndian Armyभारतीय जवानDrugsअमली पदार्थ