शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Narada Scam: ममता बॅनर्जी आतमध्ये, तरीही CBI कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 14:01 IST

Narada Scam Cbi Enquiry: विधानसभा निवडणुक संपून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे पुन्हा सरकार स्थापन होताच पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला आहे. ममतांचे सरकार स्थापन होताच, त्यांच्या मंत्र्यांविरोधात नारदा घोटाळ्याची (Narada sting case) पुन्हा चौकशी सुरु झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दोन मंत्र्यांना आणि एका आमदाराला नारडा घोटाळ्यात सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामुळे ममता यांनीदेखील सीबीआय कार्यालयात जात मलाही अटक करा, असे आव्हान दिल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. यानंतर तिथे जमलेल्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयावर जोरदार दगडफेक (stone pelting) केल्याने खळबळ उडाली आहे. (TMC supporters pelt stones at CBI office over arrest of Bengal ministers Firhad Hakim, Subrata Mukherjee)

Narada Scam: सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; मागोमाग ममतादेखील पोहोचल्या

विधानसभा निवडणुक संपून पश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे पुन्हा सरकार स्थापन होताच पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला आहे. ममतांचे सरकार स्थापन होताच, त्यांच्या मंत्र्यांविरोधात नारदा घोटाळ्याची (Narada sting case) पुन्हा चौकशी सुरु झाली आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रांसह भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या घरावर सीबीआयने (CBI) छापेमारी केली. या नंतर चारही नेत्यांना सीबीआयने कार्यालयात नेले आहे. हे समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या. 

मंत्री, आमदारांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे कळताच सीबीआय कार्यालयाबाहेर तृणणूलच्या कार्यकर्त्यांनी जमाव करत आंदोलन करण्यास सुरुवात केली. यानंतर काही वेळाने कार्यकर्त्यांनी सीबीआय ऑफिसवर दगडफेक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला आहे. राज्याचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी कोलकाता पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोलकाता पोलीस कायद्याचे पालन करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

सीबीआयने अटकेच्या वृत्ताचा केला इन्कारया चारही नेत्यांना नारदा घोटाळ्यात चौकशीसाठी सीबीआय़ कार्यालयात आणण्यात आले आहे, या चारही नेत्यांना प्रश्न विचारले जाणार आहेत. मात्र, त्यांना अटक केली नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यपाल जगदीप धनखड यांनी नारदा स्टिंग प्रकरणी फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांच्याविरोधात खटला चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. नारदा स्टिंगचा व्हिडीओ समोर आल्यावेळपासून हे नेते ममतांच्या सरकारमध्ये मंत्री होते. राज्यपालांनी निवडणूक संपताच तातडीने या नेत्यांवरील कारवाईला मंजुरी दिली होती. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी