शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नारदमुनी म्हणजे प्राचीन काळातील गुगलच; भाजपाचे आणखी एक नेते पोहोचले पुराणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 12:22 IST

भाजपच्या नेत्यांमध्ये अकलेचे तारे तोडण्याची स्पर्धा

अहमदाबाद: महाभारत काळात इंटरनेट होतं, असं विधान करुन त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी अकलेचे तारे तोडले. यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी नवी मुक्ताफळं उधळली आहेत. गुगलला ज्याप्रकारे संपूर्ण संपूर्ण जगाची माहिती आहे, तशाच प्रकारे नारदमुनींना संपूर्ण जगाची माहिती असायची, असं रुपानी यांनी म्हटलंय. 'नारदमुनी अशी व्यक्ती होती, जिच्याकडे संपूर्ण जगाची माहिती होती. ते माहितीवर काम करायचे. मानवतेच्या भल्यासाठी ते सर्व माहिती गोळा करायचे आणि या कामाची खूप आवश्यकता होती,' असं रुपानी म्हणाले.अहमदाबादमध्ये आरएसएसच्या शाखा विश्व संवाद केंद्राकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रुपानी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. 'गुगल नारदमुनींप्रमाणेच माहितीचा स्रोत आहे. गुगलकडे जगात घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती असते. नारदमुनींकडेदेखील अशाच प्रकारे संपूर्ण जगाची माहिती असायची,' असं रुपानी यांनी म्हटलं. रुपानी यांच्या आधी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी, महाभारताच्या काळात इंटरनेट होतं, असा अजब दावा केला होता. अमेरिका किंवा इतर कोणत्याही पाश्चिमात्य देशानं नव्हे, तर भारतानं शेकडो वर्षांपूर्वीच इंटरनेटचा शोध लावला होता, असं देब यांनी म्हटलं होतं. भाजपाचे मुख्यमंत्री अनेक वादग्रस्त विधानं करत असताना केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही स्टिफन हॉकिंग यांच्या मृत्यूनंतर हास्यास्पद विधान केलं होतं. 'ब्रह्मांडाचा अभ्यास करणाऱ्या हॉकिंग यांनी वेदांमध्ये असलेला सापेक्षतावादाचा सिद्धांत आईनस्टाईन यांच्या  e=mc^2 पेक्षा जास्त चांगला असल्याचं म्हटलं होतं,' असं हर्षवर्धन यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीBJPभाजपा