शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बुमरँग! राहुल गांधींच्या आवाहनानंतर नमो अॅप वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 14:10 IST

काँग्रेसच्या टीकेमुळे नुकसान होण्याऐवजी उलट Namo App ला फायदाच झाल्याचा दावा भाजपाने केला आहे. 

नवी दिल्ली: राजकारणात प्रतिस्पर्ध्याविरुद्धचा एखादा डाव आपल्यावरच कसा उलटू शकतो, याचे प्रत्यंतर सध्या काँग्रेस पक्षाला येत असावे. काही दिवसांपूर्वी सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारी फेसबुकवरील जनमत चाचणी (पोल) काँग्रेसच्या अंगलट आला होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसवर अशाप्रकारची नामुष्की ओढवली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी NamoAppच्या माध्यमातून डेटाचोरी होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसने नमो अॅपविरोधात #DeleteNamoApp अशी मोहिमच सुरु केली होती. मात्र, काँग्रेसची ही खेळी त्यांच्यावरच उलटल्याचे आता निदर्शनाल आले आहे.भाजपाच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने नमो अॅपविरोधात मोहिम सुरु केल्यापासून दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. या अॅपला मिळणाऱ्या नेहमीच्या प्रतिसादाच्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसच्या टीकेमुळे नुकसान होण्याऐवजी उलट Namo App ला फायदाच झाल्याचा दावा भाजपाने केला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी फेसबुकवरील काँग्रेसचा एक पोल रिट्विट करून काँग्रेसचे दात घशात घातले होते. काँग्रेस पक्षाकडून सोमवारी ट्विटरवर एक पोल घेण्यात आला होता. यामध्ये त्यांनी इराकमधील 39 भारतीयांच्या मृत्यू हे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे अपयश आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर हो किंवा नाही, असे दोन पर्याय देण्यात आले होते. साधारण 34 हजार लोकांनी यावर कौल दिला होता. यापैकी 76 टक्के लोकांनी यासाठी सुषमा स्वराज जबाबदार नसल्याचे सांगत 'नाही' या पर्यायावर क्लिक केले होते. तर 24 टक्के लोकांनी 'होय' या पर्यायावर क्लिक केले. साहजिकच भाजपाला लक्ष्य करण्याची काँग्रेसची खेळी त्यांच्यावरच उलटली. 

 

मात्र, त्यानंतर सुषमा स्वराज यांनी केलेल्या एका स्मार्ट खेळीने काँग्रेस आणखीनच तोंडघशी पडला. त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आलेला हा पोल रिट्विट केला. स्वराज यांच्या ट्विटर प्रोफाइलवर हा पोल पाहून अनेकांनी कमेन्टमध्ये आश्चर्य व्यक्त केले. तर अनेकांनी स्वराज यांनी ही संधी अचूक साधल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा