पंतप्रधान मोदींनी केले 'त्या' मुलीचे नामकरण
By Admin | Updated: October 22, 2016 11:37 IST2016-10-22T11:37:01+5:302016-10-22T11:37:01+5:30
पंतप्रधानांनी आपल्या मुलीचे नामकरण करावे ही उत्तरप्रदेशातील मिर्झापूर येथील एका दांम्पत्याची इच्छा नरेंद्र मोदींनी पूर्ण केली.

पंतप्रधान मोदींनी केले 'त्या' मुलीचे नामकरण
ऑनलाइन लोकमत
मिर्झापूर, दि. २२ - पंतप्रधानांनी आपल्या मुलीचे नामकरण करावे ही उत्तरप्रदेशातील मिर्झापूर येथील एका दांम्पत्याची इच्छा नरेंद्र मोदींनी पूर्ण केली. मिर्झापूर जिल्ह्यातील नयापूरा हसीपूर गावात रहाणारे भारत सिंह आणि त्यांची पत्नी विभा पंतप्रधान मोदींचे प्रशंसक असून, मोदींनी आपल्या मुलीचे नामकरण करावे अशी त्यांची इच्छा होती.
विभा सिंह यांनी १३ ऑगस्टला एका सुंदर कन्यारत्नाला जन्म दिला. त्यानंतर विभा यांनी लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून मुलीचे नामकरण करण्याची विनंती केली. एकदिवस अचानक भरत सिंह यांचा फोन खणखणला. समोरचा आवाज मोदींचा होता. हॅलो मी नरेंद्र मोदी बोलतोय, तुम्ही पत्नी विभा सिंह यांचे पत्र मिळाले. तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या घरी मुलगी आली आहे, या मुलीचे नाव वैभवी ठेवा, यात आई आणि वडिल दोघांच्या नावाचा समावेश आहे असे मोदींनी सांगितले.
या फोन कॉलनंतर माझा आनंद गगनात मावत नव्हता. मी जेव्हा शेजा-यांना याबद्दल सांगितेल. तेव्हा त्यांचा विश्वास बसला नाही. म्हणून मी पंतप्रधान कार्यालयाला पत्र देण्याची विनंती केली असे भरतने सांगितले. अखेर ३० ऑगस्टला या दांम्पत्याला पंतप्रधानांचे पत्र मिळाले. त्यात तुमच्या घरात मुलीचे आगमन झाले आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, वैभवीचे स्वप्न तुम्ही पूर्ण करा, वैभवी तुमची शक्ती बनेल असा संदेश होता.
Mirzapur:PM Modi names baby girl 'Vaibhavi' after the mother wrote letter to PM requesting him to name the baby.PM also called up the couple pic.twitter.com/QHnTNHO3Jg
— ANI UP (@ANINewsUP) October 22, 2016