नामपूरला रक्तदान शिबिर

By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:42+5:302017-01-31T02:06:42+5:30

नामपूर : आदिशक्ती श्री अन्नपूर्णा माता ट्रस्टमार्फत रक्तदान व गरजू महिलांना १२० साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापडणे येथील तंटामुक्त अध्यक्ष नवल पाटील हे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती नूतन पाटील होत्या.

Namhpura blood donation camp | नामपूरला रक्तदान शिबिर

नामपूरला रक्तदान शिबिर

मपूर : आदिशक्ती श्री अन्नपूर्णा माता ट्रस्टमार्फत रक्तदान व गरजू महिलांना १२० साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापडणे येथील तंटामुक्त अध्यक्ष नवल पाटील हे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती नूतन पाटील होत्या.
प्रारंभी ट्रस्टचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर धामणे यांनी ट्रस्टचे कार्य व भविष्यात करावयाच्या कामांची माहिती दिली. तर आदिशक्ती अन्नपूर्णा मंदिराच्या भव्य मंदिराचा आराखडा ट्रस्टचे उपाध्यक्ष आशिष लोखंडे यांनी सांगितला. मंडळाने घेतलेल्या रक्तदान शिबिरात ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे किसान सेलचे प्रदेश चिटणीस बापूसाहेब खलाणे यांनी केले.
यावेळी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मंदिरात कुलस्वामिनी जप, महिषासूरमर्दिनी स्त्रोत्र, गणेश वंदना, श्रीसुक्त आदि कार्यक्रम महिलांनी सादर केलेत. ट्रस्टच्या वतीने वर्षभरातून अनेक कार्यक्रम सादर केले जातात. आदिशक्ती अन्नपूर्णाचे भव्य दिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प या प्रसंगी करण्यात आला. या कार्यक्रमात बापूसाहेब खलाणे, जि. प. आरोग्य सभापती नूतन पाटील ट्रस्टचे ज्ञानेश्वर धामणे, आशिष लोखंडे, डॉ. दीपक नेरकर, योगेश नेरकर, विलास लोखंडे, पंचायत समिती सदस्य उषा माळी, प्रशांत नेरकर, अभिजित नेरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आभार व सूत्रसंचालन शरद नेरकर यांनी केले. (वार्ताहर)
----

Web Title: Namhpura blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.