काळा पैसाप्रकरणी तीन खातेधारकांची नावे उघड
By Admin | Updated: October 27, 2014 14:53 IST2014-10-27T12:10:37+5:302014-10-27T14:53:14+5:30
परेदशी बँकांमधील काळा पैसाप्रकरणातील तीन खातेधारकांची नावे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहेत.

काळा पैसाप्रकरणी तीन खातेधारकांची नावे उघड
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - परेदशी बँकांमध्ये काळा पैसा जमवणा-यांपैकी तिघांची नावे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहेत. केंद्र सरकारने सोमवारी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तीन खातेधारकांची नावे उघड केली आहेत. त्यामध्ये डाबर ग्रुपचे माजी संचालक प्रदीप बर्मन, राजकोटमधील व्यापारी पंकज लोढिया आणि गोव्यातील खाणकाम व्यावसायिक राधा टिम्ब्लू यांच्या नावाचा समावेश आहे. या तिघांच्या नावांसह सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात काळा पैशासंदर्भात सविस्तर माहितीही सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.
काळापैसा प्रकरणी आजचा दिवस ऐतिहासिक असून लवकरच आणखी नावे जाहीर होतील असा विश्वास भाजपातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान खाते उघडण्याच्या वेळेस आपण अनिवासी भारतीय होतो. ते खाते वैध असून आपण सर्व कर भरल्याचे सांगत याप्रकरणी आयकर विभागाला सर्व माहिती आहे, असा खुलासा बर्मन यांनी केला आहे.