शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

कोण होणार काँग्रेस अध्यक्ष? 'या' चार नावांची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 06:14 IST

पक्षाने घ्यावा निर्णय; राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधींचा नकार

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा अजिबात मागे घेणार नाही आणि नवा अध्यक्ष पक्षानेच निवडावा, असे पुन्हा स्पष्ट केल्याने काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा शोध सुरू झाला आहे. कोणत्याही वाद वा मतभेदाविना आणि सर्वसंमतीने नवा पक्षाध्यक्ष निवडण्याच्या दृष्टीने काँग्रेस नेते आता प्रयत्न करू लागले आहेत.नवा पक्षाध्यक्ष ठरवण्यात राहुल गांधी स्वत: सहभागी होणार नसले तरी सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. आपण नव्या अध्यक्षाबाबत कोणाशी चर्चाही करणार नाही, असे राहुल गांधी यांनी नेत्यांना सांगितले आहे. नवा पक्षाध्यक्ष कोणीही असला तरी त्याला आपण सहकार्य करू आणि त्याच्यासह काम करीत राहू, असेही राहुल गांधी यांनी नेत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले की, पक्षाध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावांची आहे. याशिवाय सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, मीरा कुमार, पृथ्वीराज चव्हाण यांचीही नावे पुढे आली आहेत.पक्षाचे वरिष्ठ नेते अहमद पटेल हे मुकुल वासनिक यांच्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. मात्र सुशीलकुमार शिंदे हे सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांचजे निकटवर्तीय असल्याने त्यांना अध्यक्ष केले जाण्याची शक्यता असल्याचे अनेक नेत्यांना वाटते. अँथनी, मोईलींना नको पदए. के. अँथनी यांचे नाव पुढे आले होते. पण आपल्याला हे पद नको असून, राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदी राहायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. वीरप्पा मोईली यांनीही राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे, असे म्हटले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीAshok Gahlotअशोक गहलोतSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेMukul Wasnikमुकूल वासनिक