३३ हजार मतदारांची नावे वगळली
By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:07+5:302015-07-08T23:45:07+5:30
१२ जुलै रोजी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम

३३ हजार मतदारांची नावे वगळली
१ जुलै रोजी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सोलापूर: विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये असलेल्या मतदारांपैकी ३३ हजार ७८१ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत़ २ लाख ५२ हजार मतदार ओळखपत्राचे आधारकार्डशी जोडणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली आहे़ येत्या रविवारी पुन्हा मतदार यादी शुद्धीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे़ निवडणूक आयोगाने मतदार याद्या चुका दुरुस्त करण्यासाठी ३१ जुलै २०१५ पर्यंत मतदार याद्या शुद्धीकरण अद्ययावतीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे़ नागरिकांना शासनाच्या सर्व सोयीसुविधा मिळण्याकरिता प्रॉपर्टी कार्ड, रेशन कार्ड, गॅस अनुदान, बँक सबसिडी, संजय गांधी लाभार्थी अनुदान असे शासनाचे विविध लाभ घेण्यासाठी मतदान ओळखपत्र व आधार ओळखपत्र या कागदपत्रांची सांगड घालण्याची आवश्यकता असते़ त्याकरिता एकत्रित विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे़ त्या अनुषंगाने जिल्ातील सर्व तलाठी कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत कार्यालय, वॉर्ड कार्यालय तसेच केंद्राच्या ठिकाणी १२ जुलै २०१५ रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे़ या मोहिमेत मतदार ओळखपत्र व आधार कार्ड संगणकाद्वारे जोडण्याची कार्यवाही हाती घेतली जाणार आहे़ त्यामुळे १२ जुलै रोजी होणार्या मतदार यादी शुद्धीकरणाच्या मोहिमेत नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे़