शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

Padmaavat Controversy : भन्साळींच्या आईवर 'लीला की लीला' नावाचा सिनेमा बनवून करणी सेना घेणार सूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 16:36 IST

संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित व वादग्रस्त पद्मावत सिनेमा अखेर 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकला.

नवी दिल्ली -  संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित व वादग्रस्त 'पद्मावत' सिनेमा अखेर 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकला. पद्मावत सिनेमाला करणी सेनेनं तीव्र विरोध दर्शवत देशभरात हिंसक आंदोलनं केली. सिनेमाच्या प्रदर्शनात अडचणी निर्माण करण्यासाठी करणी सेनेनं अनेक कारनामे केले, मात्र बॉक्सऑफिसवर पद्मावत रिलीज होण्यापासून रोखण्यात करणी सेना अपयशच आले. आता भन्साळी यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी करणी सेना दुस-या मार्गाचा वापर करण्याची योजना आखत आहेत.''आम्ही आता संजय लीला भन्साळी यांच्या आईवर सिनेमा बनवणार आहोत आणि 'लीला की लीला' असे त्या सिनेमाचं नाव असेल'', असे करणी सेनेनं सांगितले आहे. 

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, चित्तोडगड येथे राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष गोविंद सिंह खंगरोत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदमध्ये  भन्साळी यांच्या आईवर सिनेमा बनवणार असल्याचं त्यांनी सांगितले. 'लीला की लीला' नाव असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन अरविंद व्यास करतील.  

15 दिवसांच्या आत शुभ मुहूर्तावर सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले. भन्साळी यांनी पद्मावत बनवून माँ पद्मिनीच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवले आहे आणि याचं प्रत्युत्तर म्हणून करणी सेना लीला की लीला सिनेमाची निर्मिती करणार आहे. हा सिनेमा पाहून भन्साळींना अभिमान वाटेल, असा टोलादेखील त्यांनी हाणला आहे. ''जर देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे तर आम्हीदेखील असेच काही तरी करू इच्छित आहोत'', असंही त्यांनी सांगितले.

चार हजार थिएटर्समध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित

उग्र व हिंसक निदर्शनांना तोंड द्यावे लागलेला ‘पद्मावत’ सिनेमा गुरुवारी अतिशय कडक पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित झाला. काही ठिकाणी राखीव दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते. गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या भाजपाशासित राज्यांत तो प्रदर्शित झाला नाही, तर उत्तर प्रदेश, हरयाणा, उत्तराखंड, तामिळनाडूमध्ये तो काही ठिकाणीच झळकला. मात्र महाराष्ट्रासह बंगाल, आंध्र प्रदेश आदी नऊ महत्त्वाच्या राज्यांतील सिनेमागृहांत तो विनाविघ्न प्रदर्शित झाला. हा सिनेमा पहिल्या दिवशी चार हजार सिनेमागृहांत प्रदर्शित झाला आणि १0 लाख लोकांनी पाहिला, असा दावा निर्मात्यांनी केला आहे. या सिनेमाविरोधात करणी सेनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला गुजरातमध्ये फारसा प्रतिसाद लाभला नाही. गुजरातमधील काही मार्गांवर बससेवा बंद ठेवण्यात आली होती.

न्यायालयाचा अवमान-पद्मावतच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असतानाही गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांनी घेतलेली भूमिका आणि करणी सेनेचे आंदोलन यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे, अशा याचिका तहसीन पुनावाला व अ‍ॅड. विनीत धांडा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. त्यावर २९ जानेवारीला सुनावणी आहे.

टॅग्स :Padmavatपद्मावतPadmavatiपद्मावतीSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळीKarni Senaकरणी सेना