तपासणीच्या नावाखाली लैंगिक चाळे करणा-या डॉ. पटवर्धनला तुरुंगावास
By Admin | Updated: July 28, 2016 16:54 IST2016-07-28T15:19:47+5:302016-07-28T16:54:19+5:30
तपासणीच्या नावाखाली महिलांशी लैंगिक चाळे करणारे लंडनमधील प्रसिद्ध स्त्रीरोगविशेषज्ञ डॉ. महेश पटवर्धन यांना ८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

तपासणीच्या नावाखाली लैंगिक चाळे करणा-या डॉ. पटवर्धनला तुरुंगावास
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २९ - तपासणीच्या नावाखाली महिलांशी लैंगिक चाळे करणारे लंडनमधील प्रसिद्ध स्त्रीरोगविशेषज्ञ डॉ. महेश पटवर्धन यांना लैंगिक गुन्ह्याच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले असून त्यांना आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान पटवर्धन यांनी आपल्यासोबत गैरकृत्य केल्याची तक्रार सहा महिलांनी नोंदवली होती.
त्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान वोलोविच क्राऊन कोर्टाने पटवर्धन यांना दोषी ठरवून ही शिक्षा ठोठावली. डॉ. महेश पटवर्धन अॅलडर्टन हिल हॉस्पिटल आणि बकहर्स्ट हिल येथील आपल्या खासगी दवाखान्यात प्रॅक्टीस करायचे. तपासणी दरम्यान
महिलांच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्याबरोबर त्यांच्या शरीराला घर्षण होईल अशा पद्धतीने पटवर्धन तपासणी करायचे.
३१ जुलै २००८ ते २४ सप्टेंबर २०१२ दरम्यानच्या गुन्ह्यासाठी त्यांना दोषी ठरवले. शिक्षा सुनावणीच्यावेळी त्यांची दोन मुले आणि पत्नी कोर्टात हजर होती. महेश पटवर्धन मूळचे भारतीय वंशाचे आहेत. २० नोव्हेंबर २०१४ रोजी भारतातून आलेल्या विमानातून उतरल्यानंतर त्यांना हिथ्रो विमानतळावर अटक करण्यात आली.