हलालाच्या नावाखाली पतीनं पत्नीला मित्राशी सेक्स करण्यास पाडले भाग

By Admin | Updated: May 18, 2017 11:31 IST2017-05-18T11:31:38+5:302017-05-18T11:31:38+5:30

पत्नीला तोंडी तलाक दिल्यानंतर हलालाच्या नावाखाली मित्रांसोबत रात्र घालवण्यासाठी पतीनं विवश केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

In the name of Halalah, the husband forced his wife to have sex with a friend | हलालाच्या नावाखाली पतीनं पत्नीला मित्राशी सेक्स करण्यास पाडले भाग

हलालाच्या नावाखाली पतीनं पत्नीला मित्राशी सेक्स करण्यास पाडले भाग

>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 18 - पत्नीला तोंडी तलाक दिल्यानंतर हलालाच्या नावाखाली मित्रांसोबत रात्र घालवण्यासाठी पतीनं विवश केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर पीडित महिलेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना केली आहे. जयपूरमधील आमेर रोडवरील 40 वर्षांच्या एका महिलेचा पती ठेकेदारी आणि मालमत्तेच्या दलालीचं काम करतो. तसेच त्याला दारू आणि जुगाराचंही व्यसन आहे. त्याची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत असल्यानं पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होत असे. जवळपास 9 महिन्यांपूर्वी त्या ठेकेदारानं स्वतःची दोन मुलं आणि कुटुंबीयांसमोर स्वतःचा पत्नीला तोंडी तलाक दिला. त्याच्या दोन दिवसांआधीच त्यानं कुटुंबीयांसमोरच काही कागदपत्रांवर पत्नीच्या अंगठ्याचे ठसे घेतले होते.

तलाकनंतरही ती पीडित महिला पतीच्या घरीच राहत होती. मात्र एक दिवस तो स्वतःच्या मित्रांसमवेत जुगार खेळत होता. त्यावेळी मित्रांनी त्यांच्याशी पैज लावली की, जर त्याचा जुगारात पराभव झाला, तर एका रात्रीसाठी स्वतःच्या पत्नीला मित्रांकडे पाठवले. ठेकेदार जुगारत पैज हारला आणि त्यानं पत्नीला पुन्हा निकाह करण्याच्या नावाखाली एका फार्म हाऊसवर नेलं. तिथे त्याचा मित्र पहिल्यापासूनच उपस्थित होता. त्यानंतर दोन्ही मित्र बसून दारू पिऊ लागले आणि त्याने पत्नीला दिलेल्या ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. त्यामुळे पत्नी ज्यूस प्यायल्यानंतर बेशुद्ध झाली. त्याच वेळी त्या दोन मित्रांनी पत्नीवर अत्याचार केले आणि ठेकेदारानं त्याचा एक व्हिडीओही बनवला. मध्यरात्री पत्नी शुद्धीवर आल्यानंतर मोठमोठ्यानं ओरडली. मात्र दोन्ही मित्रांनी तिला धमकावून गप्प केलं.

दुस-या दिवशी सकाळी ठेकेदार पत्नीला घेण्यासाठी फार्म हाऊसवर आला. त्यावेळी त्यानं पत्नीला सांगितलं की, तुला पुन्हा स्वीकारण्यासाठी हलाला गरजेचा होता. शरीयतमध्ये हलाला आवश्यक असतो. ठेकेदार पत्नीला म्हणाला, आता तू दुस-यासोबत एक रात्र घालवली आहेस. ठेकेदारानं पत्नीला व्हिडीओही दाखवला आणि तो पत्नीशी जबरदस्तीनं संबंध प्रस्थापित करू लागला. एक दिवशी पत्नीनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे रीतसर तक्रार केली. मात्र पोलिसांनी हे धार्मिक प्रकरण असल्यानं तक्रार घेण्याचं टाळलं. पत्नीवर मुस्लिम समाज पतीविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी आता दबाव टाकत आहेत. त्यामुळे त्या पीडित महिलेनं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच मदतीची याचना केली आहे.    
 

Web Title: In the name of Halalah, the husband forced his wife to have sex with a friend