गोरक्षेच्या नावे हिंसाचार करणारे नरभक्षक आहेत
By Admin | Updated: July 15, 2017 00:26 IST2017-07-15T00:26:32+5:302017-07-15T00:26:32+5:30
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हे स्वयंघोषित गोरक्षक म्हणजे नरभक्षक आहेत

गोरक्षेच्या नावे हिंसाचार करणारे नरभक्षक आहेत
अहमदाबाद : गोरक्षणाच्या मुद्द्यावरून देशात हाणामारी, हत्या यांसारख्या हिंसक घटना घडत असताना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हे स्वयंघोषित गोरक्षक म्हणजे नरभक्षक आहेत, अशी टीका केली आहे. यामुळे सर्व स्तरातून भाजपा व केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनीनी कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
अहमदाबादमध्ये पश्चिम विभागातील राज्यांच्या सामाजिक कल्याण विभागांची प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात ते बोलत होते.
गोरक्षेच्या नावे अल्पसंख्यांक व दलितांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात विचारल्यावर गहलोत म्हणाले की कायदा हातात घेणाऱ्या कोणाचीही सुटका होता कामा नये. गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात
घेणाऱ्या लोकांवर काटेकोरपणे कारवाई केली जाईल.