नाव गांधीबाग पण म. गांधींचेच अस्तित्व नाही (भाग 3)
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:04+5:302015-01-29T23:17:04+5:30
बॉक्स

नाव गांधीबाग पण म. गांधींचेच अस्तित्व नाही (भाग 3)
ब क्स गांधीबाग परिसर व्यापारी केंद्र राष्ट्रसंतांच्या परिश्रमातून हा परिसर स्वच्छ करण्यात आला आणि दुर्लक्षित जागेचा उपयोग झाला. सध्या गांधीबाग परिसर व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली येथे होतात. विदर्भाच्या व्यापारी चळवळीचे केंद्र हे आहे. पण ज्यांच्यामुळे हे घडले त्या राष्ट्रसंतांचे आणि ज्यांच्या नावाने हा परिसर उभारण्यात आला त्या म. गांधी यांचा उल्लेखही या परिसरात नाही, याची खंत राष्ट्रसंतांचे सहकारी आणि ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन भिसेकर यांनी व्यक्त केली. १९५३ साली झालेल्या या परिसराच्या संपूर्ण प्रक्रियेत भिसेकर सहभागी होते. त्यावेळी त्यांनी काढलेली छायाचित्रेही त्यांच्या संग्रहात आहे. याबाबत केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना म. गांधींचा पुतळा परिसरात उभारण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावर त्यांनी मं. गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त घोषणा करून राष्ट्रसंत आणि म. गांधींच्या अनुयायांना आश्वस्त करावे, अशी मागणी भिसेकर यांनी केली आहे. --------महापालिकेने पुढाकार घ्यावा१९५३ साली गांधीबागेत झालेल्या कार्यक्रमाचे आपण स्वत: एक साक्षीदार आहोत आणि त्याची छायाचित्रेही आपल्याजवळ उपलब्ध आहेत. राष्ट्रसंतांनीच या परिसराचे नाव गांधीबाग असे ठेवले. संपूर्ण परिसरात सायकलने फिरुन ते पाहणी करायचे. आज गांधीबागेत मात्र राष्ट्रसंत आणि म. गांधी यांचा उल्लेखही नसल्याची खंत वाटते. महापालिकेजवळ यासंदर्भातील प्रस्ताव उपलब्ध आहेत. महापालिकेने पुढाकार घेऊन राष्ट्रसंत आणि म. गांधी यांच्या पुतळ्याची स्थापना करण्याचा निर्णय म. गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त करावा, असे मत गजानन भिसेकर यांनी व्यक्त केले.