अध्यक्षपदी नामदेव पवार
By Admin | Updated: September 10, 2015 16:46 IST2015-09-10T16:46:21+5:302015-09-10T16:46:21+5:30
खळद : सुपे खुर्द येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी नामदेव शंकर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी नामदेव पवार
ख द : सुपे खुर्द येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी नामदेव शंकर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संजय जगन्नाथ समगीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली. या वेळी या पदासाठी पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सोसायटीचे सचिव गंगाराम कादबाने यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.या वेळी माजी अध्यक्ष संजय समगीर, उपाध्यक्ष योगेश जगताप, संचालक पांडुरंग जगताप, बाळकृष्ण जगताप, पुष्पा जगताप, बेबी सुभागडे, सीताराम जगताप, हरिभाऊ कुंजीर, पांडुरंग म्हेत्रे, अरुण समगीर, ज्ञानदेव तानवडे उपस्थित होते.निवडीनंतर मा. सरपंच धीरज म्हेत्रे, महेश राऊत, तुषार जगताप, संजय क्षीरसागर, नीलेश पवार, मुरलीधर जगताप, मोहन जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले.फोटो : नामदेव पवार