शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'ताजमहालमध्ये आता करता येणार नाही नमाज पठण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 17:47 IST

सर्वोच्च न्यायालयानं ताजमहालमध्ये नमाज पठण करण्यावर बंदी घातली आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं ताजमहालमध्ये नमाज पठण करण्यावर बंदी घातली आहे. ताजमहाल हे जगातलं सातवं आश्चर्य आहे. त्यामुळे ताजमहाल परिसरात नमाज पठण करण्यासाठी परवानगी देता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. इतर ठिकाणीही नमाज पठण केलं जाऊ शकतं. मग ताजमहालमध्ये नमाज पठण करण्याची काय गरज आहे, असा सवालही न्यायालयानं विचारला आहे.ताजमहालमध्ये होत असलेल्या नमाज पठणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय इतिहास संकलन समितीनं ऑक्टोबर 2017मध्ये बंदी घालण्याची मागणी केली होती. ताजमहाल ही राष्ट्रीय संपत्ती आहे. मुसलमानांना धार्मिक स्थळाच्या रूपात ही राष्ट्रीय संपत्ती वापरण्याचा हक्क दिला गेला आहे काय, असा प्रश्न अखिल भारतीय इतिहास संकलन समितीनं उपस्थित केला होता. जर ताजमहालमध्ये मुसलमानांना तुम्ही नमाज पठण करण्याचा अधिकार देत असाल तर हिंदूंनाही शिव चालिसेचा जप करण्याची परवानगी द्यावी, असं मत अखिल भारतीय इतिहास संकलन समितीनं न्यायालयात याचिकेद्वारे मांडलं होतं. दरम्यान, जगातील सातवं आश्चर्य असलेला ताजमहाल दर शुक्रवारी नमाज पठणासाठी बंद ठेवण्यात येत होता. त्याचा अनेक स्तरांतून विरोध दर्शवला जात होता. तर काहींच्या मते, ताजमहाल ही वास्तू शिव मंदिराच्या जागेवर बनवण्यात आली असून, ती एका हिंदू राजानं बनवली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ताजमहालमध्ये शीव चालिसा वाचण्याचा प्रयत्न केला असता सीआयएसएफच्या जवानांनी त्यांना रोखलं होतं.  

टॅग्स :Taj MahalताजमहालSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNamajनमाज