सुनंदाने आयपीएल कोच्चीबाबत मुद्दा उपस्थित केला होता नलिनी सिंग यांनी दिली पोलिसांना माहिती: ८० मिनिटांची चौकशी
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30
नवी दिल्ली- मृत्यूच्या एक दिवस आधी सुनंदाने आपल्याजवळ आयपीएल कोच्ची टीम वादाबाबत खुलासा केला होता, ज्यात थरुर यांच्यावरील आरोप तिने स्वत:वर घेतल्याचे सांगितले होते, अशी माहिती पत्रकार नलिनी सिंग यांनी शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाला दिली. सिंग यांच्याकडे सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात सुमारे ८० मिनिटे विचारपूस करण्यात आली.

सुनंदाने आयपीएल कोच्चीबाबत मुद्दा उपस्थित केला होता नलिनी सिंग यांनी दिली पोलिसांना माहिती: ८० मिनिटांची चौकशी
न ी दिल्ली- मृत्यूच्या एक दिवस आधी सुनंदाने आपल्याजवळ आयपीएल कोच्ची टीम वादाबाबत खुलासा केला होता, ज्यात थरुर यांच्यावरील आरोप तिने स्वत:वर घेतल्याचे सांगितले होते, अशी माहिती पत्रकार नलिनी सिंग यांनी शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाला दिली. सिंग यांच्याकडे सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात सुमारे ८० मिनिटे विचारपूस करण्यात आली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष तपास पथकाने नलिनी सिंग यांच्याकडे चौकशी केली. तीत सिंग यांनी, सुनंदाने आपल्याजवळ आयपीएल मुद्याचा उल्लेख केल्याचे म्हटले. यानंतर सुनंदा एका आलिशान हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळली होती. तपास यंत्रणा आयपीएलशी संबंधित वादाला समजण्यासाठी व माजी आयपीएल कोच्ची फे्रन्चाईजीच्या व्यापारी नमुन्याच्या तपासणीसाठी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची मदत घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयपीएल वादाचा सुनंदाच्या मृत्यूशी काही संबंध आहे काय याचाही तपास हे पथक करणार आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिल्ली पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी, गरज पडल्यास या आर्थिक व्यवहाराची तपासणी केली जाईल, असे म्हटले. यात अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. ही बाब या घटनेची पार्श्वभूमी असू शकते किंवा तो उद्देशही असू शकतो. गरज पडल्यास आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित केले जाईल. याप्रकरणी थरुर यांच्याकडे काही दिवसात पुन्हा चौकशी केली जाईल, असे संकेत त्यांनी यावेळी दिले. नलिनी सिंग यांनी मागील वर्षी २० जानेवारीला दिलेल्या बयाणात मृत्यूच्या एक दिवस आधी सुनंदाने आपल्यासोबत फोनवर बोलणी केली होती व त्यात थरुर व पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्या संबंधांबाबत नाराजी व्यक्त केली होती, असे सांगितले. सुनंदा आपल्यासोबत आयपीएलबाबत बोलू इच्छित होती व थरुर यांच्यावरील टीका तिने स्वत:वर घेतली होती, असे सिंग यांनी यावेळी पुढे म्हटले.