नालेसफाईचा गोंधळ सुरुच!

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:37+5:302015-09-07T23:27:37+5:30

नालेसफाईचा गोंधळ सुरुच!

Nalassife's confusion started! | नालेसफाईचा गोंधळ सुरुच!

नालेसफाईचा गोंधळ सुरुच!

लेसफाईचा गोंधळ सुरुच!
मुंबई : मुंबईत झालेल्या नालेसफाईच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी; या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सोमवारी महापालिका सभागृह डोक्यावर घेतले. नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदार आणि संबधित अधिकारी वर्गाला जबाबदार धरण्यात यावे, असेही म्हणणे त्यांनी मांडले.
पावसाळ्यात झालेल्या नालेसफाईची चौकशी करण्यासाठी आयुक्त अजय मेहता यांनी उपायुक्त प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. समितीचा अहवाल स्थायी समितीकडे सादर झाला असून, त्यात नऊ कंत्राटदारांच्या कामाची चौकशी करण्यात आली आहे. मात्र याप्रकरणी सर्वच्या सर्व म्हणजे ५४ कंत्राटदारांची चौकशी करण्यात यावी, अशी सर्व पक्षीय नेत्यांनी मागणी केली आहे. कंत्राटदारांनी नाल्यातील गाळ वाहून नेताना दाखविलेली वाहने, गाळ टाकण्यात आलेले ठिकाण, गाळाचे प्रमाण; अशा सर्व मुद्यांची तपासणी करण्यात यावी, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सोमवारच्या सभागृहात विरोधी पक्षातील काँग्रेस सदस्यांनी नालेसफाईच्या मुद्यांहून सभात्याग केला. तर राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी सभेदरम्यान नालेसफाई प्रकरणी कंत्राटदारांसह जबाबदार अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)
..............

Web Title: Nalassife's confusion started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.