शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

नाकावाटे हवा नव्हे, विष...! दिल्लीत शाळांना दोन दिवस सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 07:44 IST

अनावश्यक बांधकामांवर टाकली बंदी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिवाळीच्या आगमनापूर्वीच आज राजधानी दिल्लीला वायू प्रदूषणाचा जबरदस्त विळखा पडून हवेची गुणवत्ता अतिशय चिंताजनक पातळीवर पोहोचली. प्रदूषणाचा तडाखा इतका तीव्र होता की आज शंभर मीटर अंतरावरुनही इंडिया गेट दिसणे दुरापास्त झाले होते. दिल्लीतील अनेक भागांमध्ये आज हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४६० ते ८६५ पर्यंत पोहोचला. 

प्रदूषण नियंत्रणासाठी उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासोबत बैठक बोलावली. या बैठकीला केजरीवाल यांनी जाणे टाळले. राज निवास येथे झालेल्या या बैठकीसाठी पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी हजेरी लावली. वायू प्रदूषणाच्या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने बैठक बोलवावी तसेच शेजारी राज्यांनीही ठोसपावले उचलावी, अशी मागणी राय यांनी केली. 

डॉक्टरांचा सल्ला...मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व सरकारी व खासगी शाळा पाचवीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगून डॉक्टरांनी नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. 

पावले उचला :  एनजीटीहवेच्या गुणवत्तेत घसरण झाल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने हवा गुणवत्ता निर्देशांक घसरलेल्या राज्यांच्या मुख्य सचिवांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. १० नोव्हेंबरपूर्वी याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही लवादाने दिले आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीpollutionप्रदूषण