शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

नगरोटा चकमकीवर धक्कादायक खुलासा; जवानांनी मोठा कट उधळला, भारतात असे घुसले होते दहशतवादी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 14:40 IST

दहशतवाद्यांकडून 11 एके-47 रायफल आणि 3 पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. प्रत्येक दहशतवादी जवळपास 3 एके-47 रायफल घेऊन जात होता.

ठळक मुद्देहे दहशतवादी पाकिस्तानातील शकरगडहून सांबा सेक्टरमध्ये भूयारी मार्गाने आले होते.11 एके-47 रायफल आणि पिस्तुलही जप्त करण्यात आली आहेत. जानेवारी महिन्यातही अशाच प्रकारची चकमक झाली होती, त्यात 3 दहशतवादी मारले गेले होते.

श्रीनगर - नगरोटा चकमकीसंदर्भात तपास करणाऱ्या संरक्षण दलाच्या संस्थांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरीसाठी भूयारी मार्गाचा वापर केल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. हे दहशतवादीपाकिस्तानातील शकरगडहून सांबा सेक्टरमध्ये भूयारी मार्गाने आले होते. तसेच, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सामानातील शस्त्र आणि दारूगोळा आधीपासूनच ट्रकमध्ये होता, अशी शक्यताही संरक्षण संस्थांनी व्यक्त केली आहे.

संरक्षण संस्थांनी दावा केला, की सीमेवर तार फेंसिंग सोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही. यामुळे भूयारी मार्गानेच दहशतवादी सांबा सेक्टरमध्ये आले असल्याचे मानले जात आहे. खरे तर भूयारी मार्गाने दहशतवादी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही.

भरतीय जवानांनी मोठा कट उधळला -जम्मूमध्ये नगरोटाजवळ गुरुवारी झालेल्या चकमकीत मारले गेलेले जैशचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर दारूगोळा घेऊन जात होते. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 11 एके-47 रायफल आणि पिस्तुलही जप्त करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांचा मोठा कट असण्याची पूर्ण शक्यता आहे. हे चारही दहशतवादी काश्मीरकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये होते. पोलिसांनी हा ट्रक टोल प्लाझाजवळ थांबवला होता. यानंतर उडालेल्या चकमकीत हे चारही दहशतवादी मारले गेले.

11 एके-47 रायफल आणि 3 पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त -दहशतवाद्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला गुरुवारी सकाळी 5 वाजेच्या सुमारास आडवण्यात आले, तेव्हा ट्रक ड्रायव्हर गडबडला आणि ट्रकमधून उडी मारून पळून गेला. यानंतर त्या ट्रकमधून पोलिसांच्या चमूवर गोळीबार सुरू झाला. नंतर प्रत्युत्तरातील कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडून 11 एके-47 रायफल आणि 3 पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. प्रत्येक दहशतवादी जवळपास 3 एके-47 रायफल घेऊन जात होता. यापूर्वी जानेवारी महिन्यातही अशाच प्रकारची चकमक झाली होती. त्यात 3 दहशतवादी मारले गेले होते.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत