शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:47 IST

१७ मेपासून बेपत्ता असलेली सुनीता जमगडे ही महिला कारगिलजवळील गावातून अचानक गायब झाली होती. विशेष म्हणजे, ती बेपत्ता होण्याआधी पाकिस्तानशी संपर्कात होती, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.

पाकिस्तानी गुप्तहेर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा यांच्या चौकशीतून दररोज धक्कादायक खुलासे होत असतानाच, आता नागपूरच्या सुनीता जमगडे या महिलेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. १७ मेपासून बेपत्ता असलेली सुनीता जमगडे ही महिला कारगिलजवळील गावातून अचानक गायब झाली होती. विशेष म्हणजे, ती बेपत्ता होण्याआधी पाकिस्तानशी संपर्कात होती, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.

लडाख पोलीस प्रमुख एस.डी. सिंह जामवाल यांनी सांगितले की, सुनीता जमगडे ही काही पाकिस्तानी मोबाईल नंबरसोबत संपर्कात होती. तपासात असंही उघड झालं आहे की, तिने यापूर्वीही यापूर्वीही अटारी-वाघा बॉर्डरमार्गे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे यावेळी ती प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये गेलेली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१२ वर्षांच्या मुलाला सोडलं एकटंसुनीता ही तिच्या १२ वर्षांच्या मुलासह लडाखमधील हुंडरमन गावात गेली होती. मात्र, तिने मुलाला तिथेच एकटं सोडलं आहे. सध्या तो मुलगा बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली आहे. सुनीता बेपत्ता झाल्याबाबत तिच्या भावाने कपिल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सहकार्य करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईकाही अहवालांनुसार, सुनीता जमगडेला सीमापार जाण्यात मदत करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र अद्याप सुनीता खरंच पाकिस्तानमध्ये गेली आहे का, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. तिच्या आर्थिक व्यवहारांचे स्रोतही संशयास्पद असल्याचे पोलिसांनी नमूद केले. 

कोण आहे सुनीता जमगडे?सुनीता ही नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. ती अचानक लडाखमध्ये कशी पोहोचली आणि सीमेजवळ कशासाठी गेली, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. लडाख पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा याप्रकरणी सखोल तपास सुरू असून, सुनीता जमगडे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसोबत संबंधित असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान