नागपूर-रिवा साप्ताहिक एक्स्प्रेस उद्यापासून
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:25+5:302015-02-10T00:56:25+5:30
नागपूर-रिवा साप्ताहिक एक्स्प्रेस उद्यापासून

नागपूर-रिवा साप्ताहिक एक्स्प्रेस उद्यापासून
न गपूर-रिवा साप्ताहिक एक्स्प्रेस उद्यापासून नितीन गडकरींची आश्वासन पूर्ती नागपूर : नागपूर-रिवा साप्ताहिक एक्स्प्रेस येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, यामुळे विदर्भातील रिवावासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. संपूर्ण विदर्भातून रिवा (मध्य प्रदेश) शहरात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. या सर्वांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान नितीन गडकरी यांच्याकडे नागपूर-रिवा गाडी सुरू करण्याची मागणी केली होती व भाजपा सत्तेत आल्यास ही मागणी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यावेळी गडकरींनी दिले होते. याच अनुषंगाने नागपूर शहराचे खासदार झाल्यानंतर सतत पाठपुरावा करून नागपूर-रिवा एक्स्प्रेस सुरू करण्याकरिता त्यांनी प्रयत्न केले. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून, बुधवार ११ फेब्रुवारी २०१५ रोजी दुपारी २.३० वाजता नागपूर-रिवा एक्स्पेस (सप्ताहिक) ही गाडी सुरू करण्यात येणार असून, यावेळी ते स्वत: उपस्थित राहून गाडीला हिरवी झेंडी दाखवून गाडीचा शुभारंभ करणार आहे. यावेळी नागरिकांना मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आणखी एका आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली असून, विदर्भात राहणाऱ्या अनेक रिवावासीयांना यामुळे नक्कीच दिलासा मिळणार आहे.