शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

उड्डाणपूल उभारण्यात नागपूरला सिंहाचा वाटा; केंद्राने दिले महाराष्ट्राला १५८० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 08:14 IST

बव्हंशी प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत किंवा मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होतील. 

- हरीश गुप्तानवी दिल्ली :  नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्रातील सर्व फ्लायओव्हर्स आणि ओव्हरब्रिज उभारण्याचे सर्व प्रकल्प २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १४ फ्लायओव्हर आणि ओव्हरब्रिज हाती घेतले आहे. बव्हंशी प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत किंवा मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होतील. या प्रकल्पास नागपूरला सिंहाचा वाटा मिळाला आहे. याची सुरुवात नागपूर-रायपूर फ्लायओव्हरने (खर्च ४४८.३२ कोटी, सात किलोमीटर लांबी) झाली आहे. महाराष्ट्रातील अशा १४ प्रकल्पांपैकी हा सर्वात मोठा फ्लायओव्हर आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नागपूर आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ परिसरापर्यंत चारपदरी फ्लायओव्हर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे.  ३१८ कोटी रुपये खर्चाच्या या फ्लायओव्हरची लांबी ४.७९ किलोमीटर आहे. नागपूरमध्ये आणखी एक फ्लायओव्हर दुमरी जंक्शन येथे नागपूर बायपास क्षेत्रात स्लीप सर्व्हिस रोडसह २३.७७ कोटी रुपयांच्या खर्चाने उभारला जात आहे. याशिवाय नागपूरमध्ये छत्तीसगड-महाराष्ट्र सीमा ते वैनगंगा पुलापर्यंत ४ पदरी प्रदूषण शमन संरचनेचे तीन प्रकल्प (खर्च ३६० कोटी)  या मंत्रालयाने हाती घेतले आहेत. 

२०२४ पूर्वी दहा प्रकल्प होतील पूर्ण

आकडेवारीतून मिळालेल्या माहितीनुसार  दहा अन्य प्रकल्प २०२४ च्या लोकसभेच्या  निवडणुकीपूर्वी विक्रमी वेळेत पूर्ण होतील. नितीन गडकरी यांचा नागपूर हा लोकसभा मतदार संघ आहे. ५३ क्रमांकांच्या राष्ट्रीय महामार्गावर कारंजा आणि गौरी इन येेथे तसेच ८४८ क्रमांकांच्या राष्ट्रीय महामार्गावरही वडपे-गोंदे विभागासह अन्य विभागातही फ्लायओव्हर उभारण्यात येत आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रNitin Gadkariनितीन गडकरी