नागपूर पतंजली चिकित्सालयाला प्रथम क्रमांक
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30
(८ बाय २)

नागपूर पतंजली चिकित्सालयाला प्रथम क्रमांक
(८ बाय २)नागपूर पतंजली चिकित्सालयाला प्रथम क्रमांकनागपूर : स्वामी रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनात देशात ६ हजार चिकित्सालयांचे संचालन होत असूून सर्वांचे आरोग्य सर्वांचा विकास हे उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले आहे. या चिकित्सालयांच्या माध्यमातून हरिद्वारतर्फे प्रशिक्षित वैद्य नि:शुल्क सेवा देऊन स्वदेशी वस्तू घरोघरी पोहचवित आहेत. नुकतेच हरिद्वारला भारतातील पतंजली चिकित्सालयांची बैठक आयोजित करण्यात आली. यात चांगले कार्य करणाऱ्या पतंजली चिकित्सालयांचा सन्मान करण्यात आला. यात मागील १० वर्षांपासून नागपूर पतंजली चिकित्सालय राव यशपाल आर्य निष्ठेने चालवित आहेत. त्यांना स्वामी रामदेव बाबा यांच्या हस्ते प्रथम क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी नागपूरकरांचे आभार मानले असून पतंजली चिकित्सालयाच्या माध्यमातून उच्च दर्जाचे स्वदेशी उत्पादन आणि चिकित्सा सेवा पुरविण्याचा संकल्प केला आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)