शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी केला नागिण डान्स, Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 13:23 IST

Police Dance Video : पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - देशभरात दिवाळी आनंदात साजरी केली जात आहे. याच दरम्यान पोलिसांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बिहारमधीलपोलिसांचा नागिण डान्स तुफान व्हायरल होत आहे. पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी गाण्यांवर ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवशी हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार जिल्ह्यातील नवादा परिसरात ही घटना घडली आहे. दिवाळीच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात नागिण डान्स करून ठुमके लगावले आहेत. पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विविध गाण्यांवर नाचताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांपासून हवालदारांपर्यंत अनेकजण डान्स करत होते. 

अधिकाऱ्यांनी देखील हा व्हायरल झालेला व्हिडीओ पोलीस ठाण्यातील असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत हा प्रकार घडल्याचं म्हटलं आहे. गस्त घालण्यासाठी गेलेले असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पोलीस ठाण्यात अशा प्रकारे डान्स सुरू असल्याने त्यावर टीकेची झोड उठली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मतदारसंघाच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फटाके पेटवताना त्यांची नात गंभीर जखमी झाली होती. चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

भाजपा खासदारांच्या 6 वर्षांच्या नातीचा फटाक्याने भाजल्यामुळे मृत्यू

रीता बहुगुणा जोशी या भाजपाच्या खासदार आहेत. त्यांचा मुलगा मयंक जोशी यांची सहा वर्षांची मुलगी दिवाळीत फटाके फोडत होती. फटाके पेटवताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. आणि ती गंभीररित्या भाजली. उपचारांसाठी तिला लागलीच स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी चिमुकलीचं शरीर 60 टक्के भाजल्याचं सांगितलं. तसेच तिला उपचारांसाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला. जोशी यांच्या नातीला मंगळवारी सकाळीच एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिस