नागभवनातून सोन्याचे मंगळसूत्र पळविले
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:12+5:302015-02-20T01:10:12+5:30
नागभवनातून ८० हजाराचे मंगळसूत्र पळविले

नागभवनातून सोन्याचे मंगळसूत्र पळविले
न गभवनातून ८० हजाराचे मंगळसूत्र पळविलेनागपूर : सिव्हिल लाईन्समधील नागभवनातून ८० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात आरोपीने पळविल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संगीता रमाकांत मेहरे (५०) रा. शंकरनगर अंबाझरी यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे पाहुण्यांची व्यवस्था सिव्हिल लाईन्सच्या नागभवनातील खोली क्रमांक ७ मध्ये करण्यात आली होती. त्या १२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खोलीत विसरून सातपुडा लॉनमध्ये गेल्या. रात्री १२.३० वाजता त्या नागभवनातील आपल्या खोलीत परतल्या असता त्यांना त्यांचे मंगळसूत्र जागेवर दिसले नाही. खोलीची पाहणी केली असता अज्ञात आरोपीने मागील दारातून प्रवेश करून पर्समधील मंगळसूत्र पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.