नागापूर दरोड्यातील दोघांना जन्मठेप
By Admin | Updated: July 16, 2015 00:05 IST2015-07-15T23:48:07+5:302015-07-16T00:05:29+5:30
नाशिक : नांदगाव तालुक्यातील नागापूर येथील दरोड्यात दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत कचरू पवार व मनीषा पवार यांचा मृत्यू झाल्याची घटना २००७ मध्ये घडली होती़ या दरोड्यातील आरोपी सुरेश व्यंकटी चव्हाण, विठ्ठल श्रीराम पवार या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़

नागापूर दरोड्यातील दोघांना जन्मठेप
नाशिक : नांदगाव तालुक्यातील नागापूर येथील दरोड्यात दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत कचरू पवार व मनीषा पवार यांचा मृत्यू झाल्याची घटना २००७ मध्ये घडली होती़ या दरोड्यातील आरोपी सुरेश व्यंकटी चव्हाण, विठ्ठल श्रीराम पवार या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की़, आरोपी चव्हाण व पवार यांनी भिक्षुकाच्या वेषात येऊन पवार यांच्या शेतातील घराची पाहणी केली़ यानंतर २४ एप्रिल २००७ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास सहकार्यांसह येऊन या घरावर दरोडा टाकला़ यामध्ये दरोडेखोरांनी कुर्हाड, कोयता, लाकडी दांडक्याने पवार कुटुंबीयांना केलेल्या जबर मारहाणीत कचरू पवार व मनीषा पवार यांचा मृत्यू झाला़ तर शरद पवार, प्रभावती पवार, प्रगती पवार यांना मारहाण करून घरातील ऐवज चोरून नेला होता़
या प्रकरणी उत्तम पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती़ या गुन्ात काशीराम पवार याने तयार केलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचे हे कृत्य असल्याचे उघड झाले होते़ तसेच या टोळीने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत अनेक ठिकाणी दरोड्याचे गुन्हे केले होते़ त्याच्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्कान्वये) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़
नागापूर दरोड्याचा हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांच्या न्यायालयात सुरू होता़ यामध्ये विशेष सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी २७ साक्षीदार तपासले़ त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रभावती पवार, शरद पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली़ याप्रकरणी न्यायाधीश कदम यांनी आरोपी सुरेश व्यंकटी चव्हाण, विठ्ठल श्रीराम पवार या दोघांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली़(प्रतिनिधी)