शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भगवान शिव-पार्वतीच्या वेशात पथनाट्य; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलाकारांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 15:09 IST

भगवान शिव-पार्वतीच्या वेशात पथनाट्य सादर करताना महागाईवरुन केंद्र सरकारवर टीका करण्यात आली.

नागाव: चित्रपट निर्माती लीना माणिकेलईच्या 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरवरून झालेल्या वादात आता आसाममधील एका तरुण-तरुणीविरोधात भगवान शिव-पार्वतीचा अपमान करणे महागात पडले आहे. आसाममधील नागावमध्ये भगवान शंकराची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली, नंतर नोटीस देऊन सोडण्यात आले. अभिनेत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेला आरोपी अभिनेता काही सामाजिक मुद्द्यावर भगवान शिवाच्या वेषात रस्त्यावर पथनाट्य करत होता. 

नेमकं काय झालं?भगवान शंकराची भूमिका करणाऱ्या तरुणाला पोलीस लवकरच न्यायालयात हजर करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅससह इतर खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींविरोधात शनिवारी नागाव शहरातील कॉलेज चौकाजवळ भगवान शिव आणि माता पार्वतीची वेशभूषा करून तरुण-तरुणी दुचाकीवरून आले. यावेळी त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपल्याने शिव आणि पार्वती यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

पथनाट्यातून सरकारवर निशाणाया वादाचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेली वाढ. याशिवाय शिव आणि पार्वती यांच्यात औषधांच्या किमतीत झालेली वाढ आणि बेरोजगारीच्या समस्येवरुनही वादावादी झाली. दोन्ही कलाकारांचे वादविवाद ऐकण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. भगवान शिवाची भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत भाजप सरकार केवळ भांडवलदारांच्या हितासाठी काम करत असून या सरकारला सर्वसामान्यांची अजिबात काळजी नाही, असे म्हटले आहे. दरवाढीविरोधात कलाकारांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. याठिकाणी पथनाट्य सादर केल्यानंतर दोन्ही कलावंत बडा बाजार येथे पोहोचले आणि तेथेही अशीच पथनाट्ये सादर केली.

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने गुन्हा दाखल केलाशंकराचा वेष धारण करणाऱ्या कलाकाराचे नाव विरिंची बोरा आणि पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या मुलीचे नाव करिश्मा असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांचा अभिनय काही काळ शहरात चर्चेचा विषय ठरला होता. पण, हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करत भगवान शिवाची भूमिका करणाऱ्या तरुणांविरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या नागाव जिल्हा समितीचा रोष उसळला. विरिंची बोरा यांनी हिंदु सनातन धर्माशी खेळ केला आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे, असा आरोप दोन्ही समित्यांनी केला आहे. तसेच, विरिंची बोरा याच्याविरुद्ध नागाव सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :AssamआसामPoliceपोलिस