शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

नागालँड गोळीबार प्रकरण; मेजर-जनरल दर्जाचे अधिकारी करणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 17:53 IST

भारतीय लष्कराने नागालँडमध्ये झालेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट ऑफ इंक्वायरी होणार आहे.

नवी दिल्ली: भारतीय लष्कराने नागालँडमध्ये झालेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट ऑफ इंक्वायरी होणार आहे. दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज संसदेत दिली आहे. तसेच, एका महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश या पथकाला देण्यात आले आहेत. 

संसदेत अमित शहा काय म्हणाले ?आज लोकसभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, 'बंदी घातलेल्या नॅशनल साेशलिस्ट काउंसिल ऑफ नागालॅंड-के( NSCN-K) या संघटनेच्या युंग ओंग गटाचे अतिरेकी या भागात लपल्याची माहिती लष्कराला मिळाली हाेती. त्यानंतर जवानांनी शाेध माेहीम सुरू केली हाेती. सुरक्षा दलांना एका बाेलेराे कारमधून अतिरेकी येत असल्याची माहिती मिळाली हाेती. मजूरही बाेलेराे पिकअप वाहनातून येत हाेते.'

'अंधारामध्ये गाडी ओळखण्यात चूक झाली. जवानांनी गाडी थांबविण्याचा इशारा दिला. मात्र, गाडी थांबली नाही. त्यामुळे जवानांनी गाेळीबार सुरू केला. जवानांना चूक लक्षात येईपर्यंत 6 जणांचा गाडीतच मृत्यू झाला हाेता. या घटनेतील दोन गंभीर व्यक्तींना उपचारासाठी आसामामध्ये पाठवण्यात आले आहे. तर काही जणांवर नागालँडमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी लष्कराची 2 वाहने जाळली आणि मोठा हिंसाचार उफळला. यात लष्कराचा एक जवान शहीद झाला आणि अनेकजण जखमी झाले. तसेच त्या घटनेत आणखी 7 लोक मरण पावले.'

AFSPA कायदा हटवण्याची मागणीआज मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी मोन जिल्ह्यातील ओटिंग येथे गोळीबारात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या अंत्यविधीला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री रिओ म्हणाले, 'गृहमंत्री अमित शहा हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत. या घटनेत नुकसान झालेल्या लोकांना आम्ही मदत दिली आहे. आम्ही केंद्र सरकारला नागालँडमधून AFSPA कायदा हटवण्याची मागणी करत केली आहे.' AFSPA कायदा ईशान्येतील वादग्रस्त भागात सुरक्षा दलांना विशेष अधिकार देतो. या अंतर्गत सुरक्षा कर्मचार्‍यांना कोणत्याही वॉरंटशिवाय शोध मोहीम आणि कोणालाही अटक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

AFSPA कायद्याच्या तरतुदी सात राज्यांमध्ये लागू

या कायद्यांतर्गत संशय आल्यास कोणतेही वाहन थांबवण्याचा, झडती घेण्याचा आणि जप्ती करण्याचा अधिकार सुरक्षा कर्मचाऱ्यांना आहे. अटकेदरम्यान ते कोणत्याही प्रकारची शक्ती वापरू शकतात. AFSPA च्या तरतुदी ईशान्येकडील देशातील सात राज्यांमध्ये लागू आहेत. सुरुवातीला हा कायदा अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरामध्ये लागू करण्यात आला. वाढत्या अतिरेकी कारवायांमुळे 1990 साली जम्मू-काश्मीरमध्येही हा कायदा लागू करण्यात आला. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदChief Ministerमुख्यमंत्रीnagaland-pcनागालँड