शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

नागालँडमध्ये भाजपाचं 'नवा गडी, नवं राज्य'; जुन्या मित्राला मागे टाकत मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 12:39 IST

नागा पिपल्स फ्रंट पक्ष या ठिकाणी 2003 पासून सत्तेत होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीचे निकाल पाहता भाजपाने राज्यात स्वत:ची पाळेमुळे रोवण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोहिमा - ईशान्य भारतामधील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी(3 मार्च) जाहीर झाले. सुरुवातीचे कल पाहता त्रिपुरामध्ये भाजपाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. याठिकाणी तब्बल 25 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे सरकार येणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मेघालयात भाजपाला तितकेसे यश मिळालेले नाही. याठिकाणी काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असल्याचे चित्र आहे.या दोन राज्यांबरोबर नागालँडमध्ये सत्ताधारी नागा पिपल्स फ्रंटने (एनपीएफ) भाजपासोबतची 15 वर्षांची युती तोडल्यामुळे  तिथे काय होणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. एनपीएफमधून फुटून निघालेले माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नेपीयू रीयो यांच्या  नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीशी (एनडीपीपी) भाजपाने युती केली होती. दुपारी 12 वाजेपर्यंतचे निकाल पाहता, नागालँडमध्येही भाजपने नव्या मित्रासोबत (एनडीपीपी) चांगले यश मिळवल्याचे चित्र आहे. नागालँड विधानसभेची सदस्य संख्या ६० असून ५९ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. मावळत्या विधानसभेत एनपीएफचे ३८ , काँग्रेस-८, राष्ट्रवादी काँग्रेस-४, भाजप-१, जेडीयू-१ अपक्ष-८ असे पक्षीय बलाबल होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीनुसार भाजपा-एनडीपीपी 32, एनपीएफ 26 आणि अपक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे तुर्तास तरी भाजप आपल्या नव्या मित्राच्या सहाय्याने नागालँडमध्ये पुन्हा सत्तेत येईल, असे चित्र दिसत आहे. नागा पिपल्स फ्रंट पक्ष या ठिकाणी 2003 पासून सत्तेत होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीचे निकाल पाहता भाजपाने राज्यात स्वत:ची पाळेमुळे रोवण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Northeast Election Results 2018ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018Naga Peoples Frontनागा पीपल्स फ्रंटBJPभाजपाNagaland Election Results 2018नागालँड निवडणूक निकाल 2018