विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार
By Admin | Updated: September 6, 2015 23:09 IST2015-09-06T23:09:20+5:302015-09-06T23:09:20+5:30

विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार
> विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार नागपूर : महारोगी तसेच वंचित उपेक्षितांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या डॉ. विकास आमटे यांना नागपूर अवॉर्ड फाऊंडेशनच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा नागभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. नागपूर शहराच्या त्रिशताब्दीनिमित्त विदर्भाच्या विकासासाठी भरघोस कार्य केलेल्या तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विदर्भाचा लौकिक वाढविलेल्या, समाजकार्यासाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तीस दरवर्षी नागभूषण परस्कार देऊन गौरविले जाते. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी या पुरस्कारासाठी महारोगी सेवा समिती, वरोरा अंतर्गत समाजातील उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचे बळ देणाऱ्या डॉ. विकास आमटे यांची निवड करण्यात आली. १५ सप्टेंबरला शंकरनगर चौकातील साई सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते समारंभपूर्वक त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, सवार्ेच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही.एम. सिरपूरकर, खा. अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे उपस्थित राहणार आहेत.