शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: महाराष्ट्रानंतर ओडिशामध्ये आता कोरोना लसींचा तुटवडा; ७०० केंद्र बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:40 IST

corona vaccine: महाराष्ट्रानंतर ओडिशात कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे.

ठळक मुद्देओडिशात कोरोना लसींचा तुटवडातातडीने २५ लाख कोरोना लसींचे डोस पुरवण्याची मागणीओडिशातील १४०० पैकी ७०० कोरोना लसीकरण केंद्र बंद

भुवनेश्वर: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र, पंजाब यांसारख्या राज्यांमध्ये स्थिती अधिक गंभीर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रानंतर कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने ओडिशातील ७०० लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. (nab kishore das claims that 700 centre close in odisha due to shortage of corona vaccine)

कोरोना लसींच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकार एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राकडून सातत्याने कोरोना लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे मागणी केली जात आहे. अशातच आता ओडिशाचे आरोग्यामंत्री नब किशोर दास यांनी केंद्राला पत्र पाठवून कोरोना लसींचा पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे. 

राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने प्रश्न निकाली काढावा; रोहित पवारांचा सल्ला

७०० कोरोना लसीकरण केंद्र बंद

कोरोना लसीच्या कमतरतेमुळे ओडिशामधील १४०० पैकी तब्बल ७०० लसीकरण केंद्र बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील अनेक ठिकाणची कोरोना लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. राज्यात केवळ दोन दिवसांपुरताच कोरोना लसींचा साठा उपलब्ध आहे. कोरोना लसींचा पुरवठा झाला नाही, तर राज्यातील कोरोना लसीकरण ठप्प होईल, अशी शक्यता दास यांनी वर्तवली आहे. 

२५ लाख कोरोना लसीचे डोस पाठवा

ओडिशामध्ये दररोज किमान अडीच लाख कोरोना लसींचे डोस नागरिकांना दिले जातात. आता ओडिशामध्ये केवळ ५.३४ लाख कोरोना लसींचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे केवळ दोन दिवस पुरेल, एवढाच साठा शिल्लक राहिलेला आहे. केंद्राने तातडीने किमान २५ लाख डोस ओडिशाला पाठवून द्यावेत, अशी मागणी आरोग्यमंत्री दास यांनी केली आहे. यापूर्वीही १५ लाख डोस पाठवण्याची विनंती केली होती. मात्र, त्यावर अद्याप कोणतेही उत्तर आले नसल्याचे दास यांनी म्हटले आहे. ओडिशामध्ये दररोज २ लाख कोरोना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु, लसींच्या कमरतेमुळे बुधवारी १.१० लाख लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती दास यांनी दिली. 

भयंकर! जगातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट; रुग्णसंख्या १३ कोटी ३० लाख

दरम्यान, देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी? राज्यात आज केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. पण इतर राज्यांना ४० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यात राजकारणाचा मुद्दा नाही. पण ज्या पद्धतीने पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख डोसेस द्या त्यापेक्षा अधिक आमची काहीच मागणी नाही, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारOdishaओदिशाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस