शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

एएन 32 चे रहस्यमयी अपघात; यापूर्वीची 2 विमाने अद्याप बेपत्ताच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 19:42 IST

3 जूनला झालेल्या अपघातातील विमानाचे अवशेष शोधण्यासाठी भारताची तिनही सैन्यदले प्रयत्न करत होती.

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हवाई दलाच्या 13 जवानांना नेणारे मालवाहू विमान अरुणाचलच्या डोंगररांगांमध्ये गायब झाले होते. मात्र, युद्धस्तरावर शोध घेतल्यानंतर हे विमान भारतीय सैन्याला सापडले असून 13 जण शहीद झाले आहेत. एएन 32 हे विमान गायब होण्याचे प्रकार या आधीही भारतासोबत घडले आहेत. मात्र, या प्रकारामागचे कारण शोधण्यास अपयश आले आहे. 

3 जूनला झालेल्या अपघातातील विमानाचे अवशेष शोधण्यासाठी भारताची तिनही सैन्यदले प्रयत्न करत होती. यापूर्वीही दोन विमाने गायब झाली असून अद्याप या विमानांचा शोध लागलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या विमानाचे अवशेष ज्या भागात मिळाले आहेत त्या भागात या आधीही अनेकदा विमानांचे अवशेष सापडलेले आहेत. यामध्ये दुसऱ्या विश्व युद्धातील विमानांची संख्या जास्त आहे. 

1986 मध्ये गायब झालेले पहिले विमानएएन-32 च्या गायब होण्याची पहिली घटना 25 मार्च 1986 मध्ये घडली. सोव्हियत युनियन आणि ओमानच्या वाटेने हे विमान भारतात येत होते. हिंदी महासागरावर असताना हे विमान गायब झाले. या विमानामध्ये सातजण होते. आजपर्यंत या विमानाचा थांगपत्ता लागलेला नाही. 

2016 मध्ये दुसरी घटनाजुलै 2016 मध्ये बंगालच्या खाडीवरून एएन-32 चे दुसरे विमान गायब झाले होते. या विमानामध्ये 29 जण प्रवास करत होते. भारतीय हवाई दलाने महिनाभर शोध घेतला होता. मात्र, याही विमानाबाबत काही पत्ता लागला नाही. 

नुकतीच झालेली विमान दुर्घटना ही तिसरी होती. मात्र, या विमानाचे अवशेष मिळाल्याने हवाई दलाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. एएन-32 याच विमानाच्या बाबतीत या घटना का होतात याचे उत्तर कोणाकडेच नाही.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलAccidentअपघात