शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भारतात शिरले रक्तानं माखलेले म्यानमारचे लोक, 5000 जणांनी केलं सरेंडर; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 17:29 IST

बॉम्बस्फोटांमधून जीव वाचविण्यासाठी म्यानमारमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भारतात प्रवेश केला आहे. महत्वाचे म्हणजे, यांत म्यानमारच्या 39 सैनिकांचाही समावेश होता.

भारताच्या सीमेला लागून असलेल्या म्यानमारमधील एका गावात रविवारी रात्री लष्कर आणि बंडखोरांमध्ये जोरदार चकमक उडाली. यावेळी, जबरदस्त गोळीबारही झाला आणि बॉम्बफेकही करण्यात आली. या बॉम्बस्फोटांमधून जीव वाचविण्यासाठी म्यानमारमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भारतात प्रवेश केला आहे. महत्वाचे म्हणजे, यांत म्यानमारच्या 39 सैनिकांचाही समावेश होता.

यासंदर्भात, मिझोरम पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीपल डिफेन्स फोर्स, चायना डिफेन्स फोर्स आणि चिन नॅशनल आर्मी नावाच्या बंडखोर संघटनांनी रिखिद्वार आणि खावमावी येथे असलेल्या म्यानमार आर्मीच्या चौक्यांवर गोळीबार केला. हे गाव मिझोरामच्या चंपाई जिल्ह्यातील जोख्तावतार जवळ आहे.

रात्रभर चालला गोळीबार -बंडखोरांचा हा गोळीबार रात्रभार सुरू होता, असे समजते. बंडखोर गटांनी म्यानमार लष्कराच्या चौक्यांवर कब्जा केला आहे आणि तेथील सैनिकांना पळवून लावले आहे. यानंतर, सोमवारी सकाळी म्यानमार लष्कराने येथे बॉम्बफेक सुरू केल्यानंतर, येथील लोक स्वतःचा जीव वाचवून आश्रयासाठी भारतात शिरले आहेत. मिझोरम पोलीस आयजी लालबियाक्ख्तंगा खियांग्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारील देशातून 39 सैनिक आणि 5000 म्यानमारचे नागरिक भारतात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार या सर्वांना सीमेवर तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांकडे सोपवण्यात आले आहे.

म्यानमारच्या सैनिकांना परत पाठवलं -माध्यमांतील वृत्तांनुसार, मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या विमानाने म्यानमारच्या 39 सैनिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले आहे. खियांग्ते म्हणाले, 5 हजार लोकांपैकी 21 जण जखमी झाले आहेत. यांतील आठ जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी आयजोल येथे पाठविण्यात आले आहे. याशिवाय इतरांना चंपाईच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

टॅग्स :Myanmarम्यानमारSoldierसैनिकFiringगोळीबार