भारतात शिरले रक्तानं माखलेले म्यानमारचे लोक, 5000 जणांनी केलं सरेंडर; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 05:28 PM2023-11-14T17:28:05+5:302023-11-14T17:29:28+5:30

बॉम्बस्फोटांमधून जीव वाचविण्यासाठी म्यानमारमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भारतात प्रवेश केला आहे. महत्वाचे म्हणजे, यांत म्यानमारच्या 39 सैनिकांचाही समावेश होता.

Myanmar citizens entered India 5000 people surrendered know about What exactly happened | भारतात शिरले रक्तानं माखलेले म्यानमारचे लोक, 5000 जणांनी केलं सरेंडर; नेमकं काय घडलं?

भारतात शिरले रक्तानं माखलेले म्यानमारचे लोक, 5000 जणांनी केलं सरेंडर; नेमकं काय घडलं?

भारताच्या सीमेला लागून असलेल्या म्यानमारमधील एका गावात रविवारी रात्री लष्कर आणि बंडखोरांमध्ये जोरदार चकमक उडाली. यावेळी, जबरदस्त गोळीबारही झाला आणि बॉम्बफेकही करण्यात आली. या बॉम्बस्फोटांमधून जीव वाचविण्यासाठी म्यानमारमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भारतात प्रवेश केला आहे. महत्वाचे म्हणजे, यांत म्यानमारच्या 39 सैनिकांचाही समावेश होता.

यासंदर्भात, मिझोरम पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीपल डिफेन्स फोर्स, चायना डिफेन्स फोर्स आणि चिन नॅशनल आर्मी नावाच्या बंडखोर संघटनांनी रिखिद्वार आणि खावमावी येथे असलेल्या म्यानमार आर्मीच्या चौक्यांवर गोळीबार केला. हे गाव मिझोरामच्या चंपाई जिल्ह्यातील जोख्तावतार जवळ आहे.

रात्रभर चालला गोळीबार -
बंडखोरांचा हा गोळीबार रात्रभार सुरू होता, असे समजते. बंडखोर गटांनी म्यानमार लष्कराच्या चौक्यांवर कब्जा केला आहे आणि तेथील सैनिकांना पळवून लावले आहे. यानंतर, सोमवारी सकाळी म्यानमार लष्कराने येथे बॉम्बफेक सुरू केल्यानंतर, येथील लोक स्वतःचा जीव वाचवून आश्रयासाठी भारतात शिरले आहेत. मिझोरम पोलीस आयजी लालबियाक्ख्तंगा खियांग्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारील देशातून 39 सैनिक आणि 5000 म्यानमारचे नागरिक भारतात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार या सर्वांना सीमेवर तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांकडे सोपवण्यात आले आहे.

म्यानमारच्या सैनिकांना परत पाठवलं -
माध्यमांतील वृत्तांनुसार, मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या विमानाने म्यानमारच्या 39 सैनिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले आहे. खियांग्ते म्हणाले, 5 हजार लोकांपैकी 21 जण जखमी झाले आहेत. यांतील आठ जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी आयजोल येथे पाठविण्यात आले आहे. याशिवाय इतरांना चंपाईच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 

Web Title: Myanmar citizens entered India 5000 people surrendered know about What exactly happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.