शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"माझी पत्नी सुंदर, मी कांड करतो", सपा आमदाराचे बेताल वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 18:14 IST

Amitabh Bajpai : आता कानपूरमधील आर्यनगरमधील समाजवादी पक्षाचे आमदार अमिताभ वाजपेयी यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, आता उर्वरित टप्प्यात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अनेक नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता कानपूरमधील आर्यनगरमधील समाजवादी पक्षाचे आमदार अमिताभ वाजपेयी यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांचे विधान हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे.

या व्हिडीओमध्ये अमिताभ वाजपेयी सुंदरकांडवरून काही टिप्पणी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका कार्यक्रमाचा आहे, ज्यामध्ये अमिताभ वाजपेयी यांनी म्हटले आहे की, 'मी सुंदरकांड यासाठी केले आहे, कारण माझी पत्नी सुंदर आहे आणि मी कांड करत असतो.'  नुकतेच अमिताभ वाजपेयी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि यावेळी त्यांनी सुंदरकांड कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान प्रचंड गर्दी झाली होती. 

धार्मिक कार्यक्रमाला कॉमेडी शो बनवण्याच्या उद्देशाने त्यांनी असे विधान केले की, जे धर्माशी संबंधित लोकही याला हिंदू धर्मग्रंथांचा अपमान म्हणत आहेत. कार्यक्रमादरम्यान, त्यांनी सर्व लोकांसमोर हे मान्य केले की,  ते कांड करत असतात आणि त्याची पत्नी सुंदर आहे, म्हणूनच त्यांनी या सुंदरकांडचे आयोजन केले आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिले स्पष्टीकरण...व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या विधानावर स्वतःच स्पष्टीकरण देताना अमिताभ वाजपेयी म्हणाले की, धर्मग्रंथाचा अपमान करण्यासारखे काही नाही आणि हा भाजपाच्या लोकांचा अपप्रचार आहे.

विधानाला वैयक्तिक टिप्पणी असल्याचे म्हणाले...दरम्यान, हा व्हिडिओ गेल्या 14 फेब्रुवारीचा आहे. 'त्या दिवशी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता, कोणाला काय हरकत आहे का? हा भाजपाने धर्माचा ठेका घेतला आहे का? मी पण बिसबिसुआचा ब्राह्मण आहे. मी माझ्या बायकोशी विनोद करतो, इतर कोणाला यावर भाष्य करण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल करत ते विधान वैयक्तिक टिप्पणी असल्याचे अमिताभ वाजपेयी यांनी सांगितले.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Samajwadi Partyसमाजवादी पार्टी