माझी आई इंद्राणीसारखी अनेकांशी सेक्स करते - सातवीतल्या मुलाची धक्कादायक नोट

By Admin | Updated: September 3, 2015 16:13 IST2015-09-03T16:12:17+5:302015-09-03T16:13:55+5:30

दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित शाळेतल्या सातवीतल्या मुलाने माझी आई इंद्राणी मुखर्जीसारखी असून ती अनेक पुरुषांशी सेक्स करते अशी नोट लिहिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

My mother has sex with many people like Indrani - a shocking note of the seventh child | माझी आई इंद्राणीसारखी अनेकांशी सेक्स करते - सातवीतल्या मुलाची धक्कादायक नोट

माझी आई इंद्राणीसारखी अनेकांशी सेक्स करते - सातवीतल्या मुलाची धक्कादायक नोट

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित शाळेतल्या सातवीतल्या मुलाने माझी आई इंद्राणी मुखर्जीसारखी असून ती अनेक पुरुषांशी सेक्स करते अशी नोट लिहिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या शाळेतल्या सातवीतल्या क्लासमध्ये शिक्षिकेला एक मुलगा काही कागद दुस-या मुलाकडे देताना आढळला. असं नेहमी घडत असल्यानं शिक्षिकेनं त्याच्याकडून त्या नोट्स काढून घेतल्या, मात्र त्यातल्या मजकूर बघितल्यावर त्यांना धक्काच बसला. मी अनौरस मुलगा असून माझी आई इंद्राणी मुखर्जीसारखी आहे. तिला अनेक पुरुषांशी सेक्स करायला आवडतं, असं लिहिलेला तो कागद होता आणि हा मुलगा तो अन्य मुलांना देत होता.
मुख्याध्यापकांना या प्रकाराची कल्पना देण्यात आल्यानंतर त्यांनी या मुलाच्या पालकांना बोलावलं आणि त्या मुलाला निलंबित केलं. त्या मुलाला आता मानसशास्त्रीय सल्ला देण्यात येत आहे. अशी प्रकरण कशी हाताळायची असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला आहे. अशा बातम्या बघू नका, कारण त्यांचा मनावर विपरीत परिणाम होतो हे मुलांना कसं सांगायचं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. 
अल्पवयीन मुलांच्या मनावर बातम्या कशा परिणाम करतात याचं हे उदाहरण आहे. प्रसारमाध्यमांचा मुलांवर काय परिणाम होतो याचा पुरेसा अभ्यास झाला नसल्याचं मत अशोक अग्रवाल या बालहक्कांसदर्भात काम करणा-या वकिलांनी व्यक्त केलं आहे. प्रसारमाध्यमांनी निष्कर्ष काढणं, आरोपींच्या ट्रायल घेणं बंद करायला हवं असं अग्रवाल सांगतात. 
मुलींची छेडछाड करणं, अश्लील हावभाव करणं, लैंगिक छळाचे प्राण वाढणं असे अनेक प्रकार दिवसेंदिवस वाढत असून शाळा व्यवस्थापनांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मुलांवर घरांमध्येच चांगले संस्कार व्हायला हवेत आणि मुलं काय बघतात, काय वाचतात, कुणाबरोबर असतात याचं निरीक्षण पालकांनी करायला हवं असं मत शाळा व्यवस्थापनांकडून होत आहे.

Web Title: My mother has sex with many people like Indrani - a shocking note of the seventh child