माझ्या आईला मिळाला होता मला मारण्याचा सल्ला - स्मृति ईराणी
By Admin | Updated: June 27, 2014 21:28 IST2014-06-27T18:02:23+5:302014-06-27T21:28:18+5:30
'मुली या ओझं असतात' असे सांगत काही लोकांनी माझ्या आईला मला मारण्याचा सल्ला दिला होता, असा खुलासा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी यांनी केला आहे.

माझ्या आईला मिळाला होता मला मारण्याचा सल्ला - स्मृति ईराणी
>ऑनलाइन टीम
भोपाळ, दि. २७ - 'मुली या ओझं असतात' असे सांगत काही लोकांनी माझ्या आईला मला मारण्याचा सल्ला दिला होता, असा खुलासा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी यांनी केला आहे. भोपळमधील शालेय विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलताना स्मृती ईराणी यांनी हे उत्तर दिले. त्या म्हणाल्या 'मी पहिल्यांदाच याबाबत बोलत आहे. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा काही लोकांनी माझ्या आईला सांगितले की मुली म्हणजे ओझं असतात आणि त्यांनी आईला मला मारून टाकण्याचाही सल्ला दिला. पण माझी आई शूर आणि कणखर होती, तिने असे काहीही केले नाही. आणि तिच्यामुळेच मी आज इथे तुम्हा सर्वांसमोर उभी आहे.'
कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी असलेल्या स्मृती यांनी यावेळी महिलांना अवश्य शिक्षण दिले पाहिजे असेही सांगितले. 'मुलीलाल शिक्षम दिल्याने तुम्ही अशा एका कुटुंबालाही शिक्षण देता, ज्यामुळे समाजाचा विकास होण्यास मदत होते,' असे त्या म्हणाल्या.
स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकार लवकरच नवी योजना लागू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.