शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराचे थैमान, 66 मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 08:30 IST

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 66 मुलांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे.एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 66 मुलांचा मृत्यू झाला आहे.लिची हे फळ खाल्ल्याने बिहारमध्ये 66 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

मुजफ्फरपूर  - बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 66 मुलांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपूरमध्ये इन्सेफेलाईटीस या आजाराने तब्बल 66 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एसकेएससीएच या रुग्णालयात 55 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर केजरीवाल रुग्णालयामध्ये 11 मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजारात मुलांना ताप येतो. त्यांच्यावर सध्या अनेक रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्येक वर्षी अनेक मुले या इन्सेफेलाईटीस तापाने दगावतात. गेल्या वर्षीही या आजाराने 22 मुलांचा मृत्यू झाला होता. दरवर्षी पावसाळ्याआधी हा आजार होत असल्याची माहिती लोकांनी दिली आहे. 

2014 पासून इन्सेफेलाईटिस हा आजार मुलांना होत आहे. पाच ते दहा वयोगटातील मुलांना हा आजार होतो. तसेच यामुळे दरवर्षी अनेक मुलांचा मृत्यू होतो. मात्र तरीही सरकारने याबाबत अज्ञाप गंभीर दखल घेतलेली नसल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. डोकं दुखणं, अशक्तपणा येणं, उलट्या होणं, भूक न लागणं, अतिसंवेदनशील होणं ही या आजाराची लक्षणं आहेत. त्यामुळे अशा गोष्टींचा त्रास होत असल्याचं त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

 

लिची खाल्ल्याने बिहारमधील बालकांचा मृत्यू? जाणून घ्या खरे कारणलिची हे फळ खाल्ल्याने बिहारमध्ये 66 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत 179 या तापाचे संदिग्ध रुग्ण आढळले आहेत. रिकाम्या पोटी लिची खाल्ल्याने मुले या रोगाची बळी पडल्याचे सांगितले जाते. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम  (AES) म्हणजे शरिरातील मुख्य मज्जासंस्थेला प्रभावित करतो. लहान मुलांची मज्जासंस्था कमजोर असल्याने त्यावर जास्त परिणाम होतो. सुरुवातीला जोरदार ताप येतो. यानंतर शरीर दुखणे, हालचालीवर परिणाम, मानसिक अस्वस्थता, बेशुद्ध होणे, आकड्या येणे, भीती, कोमामध्ये जाणे अशी लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. हा आजार जून ते ऑक्टोबर दरम्यान बळावतो. 

लिचीचे कनेक्शन काय?

'द लॅन्सेट' नावाच्या मोडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये लिचीचे प्राकृतिक रूप हाइपोग्लीसीन ए मध्ये मोडते. यामुळे शरीरात फॅटी अ‍ॅसिड बनविण्यास व्यत्यय येतो. यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण घसरते आणि मेंदूशी संबंधीत आजार वाढू लागतो. सकाळी किंवा सायंकाळी उपाशीपोटी लिची न खाण्याचा सल्ला बिहारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. बिहारमध्ये कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे. यामुळे तेथील मुले कमजोर असतात. यामुळे या सिंड्रोमचा जादा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Biharबिहारdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू