मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरातील जाट कॉलनीत जमावाने दुस:या समुदायाच्या चार विद्याथ्र्याना मारहाण केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे विद्यार्थी संध्याकाळच्या सुमारास या कॉलनीत शिकवणीसाठी गेले असता, त्यांनी छेडछाड केल्याचे कारण सांगून या जमावाने त्यांना मारहाण केली होती. संतप्त नागरिकांच्या तावडीतून या विद्याथ्र्याना सोडवून पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने संतप्त झालेल्या अन्य समुदायाच्या लोकांनी पोलीस स्टेशनला घेराव घालून विद्याथ्र्याना मारहाण करणा:यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी 15क् जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी येथील मीनाक्षी चौकात काही नागरिकांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (वृत्तसंस्था)