मस्ट- आयटीआयच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:15+5:302015-08-27T23:45:15+5:30
आयटीआयच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ

मस्ट- आयटीआयच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ
आ टीआयच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ नागपूर : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागांतर्गत आयटीआयच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४० वर्षांपूर्वी निश्चित केलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांना ४० रुपये विद्यावेतन दिले जात होते. त्याच शासनाने वाढ केली असून आता एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुंबई येथील दालनात १७ जून २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत आयटीआयच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एक हजार रुपये प्रत्येकी विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी तात्काळ मंजुरी देत तसे आदेश जारी केले. सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल संघटनेच्यावतीने भय्यासाहेब शेलारे, शेषराव हाडके, डॉ. रामदास लिहीतकर, विनेश शेवाळे, कैलाश खांडे यांनी अभिनंदन केले आहे.