लव्ह जिहादमधील मुसलमानांना कठोर शिक्षा पाहिजे - शिया धर्मगुरु

By Admin | Updated: September 12, 2014 11:34 IST2014-09-12T10:40:38+5:302014-09-12T11:34:19+5:30

ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादीक यांनी लव्ह जिहादमध्ये गुंतलेल्या मुसलमानांना मारुन टाकायला पाहिजे असे विधान केले आहे.

Muslims of love jihad need strict punishment - Shiite cleric | लव्ह जिहादमधील मुसलमानांना कठोर शिक्षा पाहिजे - शिया धर्मगुरु

लव्ह जिहादमधील मुसलमानांना कठोर शिक्षा पाहिजे - शिया धर्मगुरु

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ - उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादवरुन वादग्रस्त विधान करण्याची मालिका सुरु असून शुक्रवारी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादीक यांनी लव्ह जिहादमध्ये गुंतलेल्या मुसलमानांना मारुन टाकायला पाहिजे असे विधान केले आहे. 
वाराणसी येथील एका कार्यक्रमात कल्बे सादीक यांना लव्ह जिहादविषयी विचारण्यात आले. यावर सादीक म्हणाले, प्रेम आणि लग्नाच्या नावाखाली धर्म स्वीकारायला लावणे हे इस्लाममध्ये अमान्य आहे. यामुळे समाजाचे नाव खराब होत आहे. आईवडिलांनी  लव्ह जिहादमध्ये गुंतलेल्या मुलांविषयी कठोर भूमिका घेणे गरजे आहे. 
पूरग्रस्त पाकिस्तानला मदतीचा हात पुढे करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इराकलाही असाच मदतीचा हात द्यावा असे सादीक यांनी नमूद केले. पाकिस्तानमधील अत्याचाराविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केल्याने माझ्यावर पाकिस्तानमध्ये प्रवेशबंदी टाकण्यात आली आहे. पाकिस्तान हे पापीस्तान आहे अशी बोचरी टीकाही सादीक यांनी केली. 

Web Title: Muslims of love jihad need strict punishment - Shiite cleric