मुस्लिमांनो, डौलाने तिरंगा फडकवा !

By Admin | Updated: August 15, 2015 02:23 IST2015-08-15T02:15:15+5:302015-08-15T02:23:24+5:30

धक्कादायक फतवे काढून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या दारुल उलुम देवबंदने स्वातंत्र्यदिनी शनिवारी मुस्लीम बांधवांनी आपल्या घरांवर तिरंगा फडकवावा असा फतवा काढला असून, स्वातंत्र्य दिन

Muslims, the groom should fly the tricolor! | मुस्लिमांनो, डौलाने तिरंगा फडकवा !

मुस्लिमांनो, डौलाने तिरंगा फडकवा !

फैजाबाद : धक्कादायक फतवे काढून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या दारुल उलुम देवबंदने स्वातंत्र्यदिनी शनिवारी मुस्लीम बांधवांनी आपल्या घरांवर तिरंगा फडकवावा असा फतवा काढला असून, स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्याचे आवाहनही केले आहे.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात दारुल उलुमच्या उलेमांनी (मुस्लीम धार्मिक नेते) महत्त्वाची भूमिका वठविली होती. सर्वप्रथम दारुल उलुमनेच संपूर्ण स्वातंत्र्याचे आवाहन केले होते. त्यानंतर पूर्ण स्वराज्याची चळवळ सुरू झाली होती, याचे स्मरण देवबंदचे प्रवक्ते अशरफ उस्मानी यांनी यानिमित्त करून दिले. मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता हुसेन अहमद मदानी यांच्यापासून तर मौलवी अहमदुल्ला शाह यांच्यापर्यंत अनेक स्वातंत्र्य सेनानींनी जीवाची बाजी लावली. याकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, की देवबंदने सर्व मुस्लीम बांधवांना घरांवर तसेच व्यावसायिक संस्थांवर तिरंगा फडकाविण्याचे आवाहन केले आहे. (वृत्तसंस्था)

देशभक्तीचे धडे
काही धर्मांध शक्तींद्वारे मुस्लीम समुदायाला नेहमीच लक्ष्य केले जाते. आमच्या देशभक्तीवर संशय घेतला जातो. परंतु आम्ही आमच्या मदरशांमध्ये परस्परांप्रती प्रेम आणि देशभक्तीचे धडे देतो. यापूर्वीही आम्ही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरे केले असून, देशभक्तीची ही परंपरा पुढेही सुरूच राहील, अशी भावना अयोध्येत मदरसा चालविणारे हाफीज अखलक अहमद लतिफ यांनी व्यक्त केली.

Web Title: Muslims, the groom should fly the tricolor!