गाईचा चारा विकण्यास मनाई केली म्हणून पंजाबमध्ये मुस्लिमाने जाळून घेतले
By Admin | Updated: October 13, 2015 16:55 IST2015-10-13T16:48:30+5:302015-10-13T16:55:16+5:30
मुस्लिम असल्याने गाईचा चारा विकण्यास मनाई केल्याने पंजाबमध्ये एका ४० वर्षीय इसमाने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

गाईचा चारा विकण्यास मनाई केली म्हणून पंजाबमध्ये मुस्लिमाने जाळून घेतले
>ऑनलाइन लोकमत
भटिंडा, दि. १३ - मुस्लिम असल्याने गाईचा चारा विकण्यास मनाई केल्याने पंजाबमध्ये एका ४० वर्षीय इसमाने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मोहम्मद असे पीडित इसमाचे नाव असून या दुर्घटनेत तो ६० टक्के भाजला आहे, सध्या त्याच्यावर फरीदकोट येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशमधील दादरी येथे जमावाने एका मुस्लिमाची हत्या केल्यावरून देशभरातील वातावरण तापलेले असतानाच ही घटना घडली असून हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
बाल गोपाल गोशाळेत मोहम्मद आणि इतर कर्मचा-यांमध्ये वाद झाला. इतरधर्मीय असल्याने मोहम्मदने चारा विकू नये असे त्या गोशाळेतील कर्मचा-यांचे म्हणणे होते. त्या वादानंतर मोहम्मदने स्वत:ला पेटवून घेतले. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोनू (३२) या गोशाळेतील कर्मचा-या अटक केली असून मोहम्मदला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी मोनूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.