'त्या' मुस्लिम तरुणाला अदानी समुहात नोकरी

By Admin | Updated: May 31, 2015 12:55 IST2015-05-31T12:55:01+5:302015-05-31T12:55:01+5:30

मुस्लिम असल्याने हिरेकंपनीने नोकरी नाकारलेल्या झीशान अली खान या तरुणाला अखेर अदानी समुहाने आधार दिला आहे.

Muslim youth working in the Adani group | 'त्या' मुस्लिम तरुणाला अदानी समुहात नोकरी

'त्या' मुस्लिम तरुणाला अदानी समुहात नोकरी

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि.३१ - मुस्लिम असल्याने हिरेकंपनीने नोकरी नाकारलेल्या झीशान अली खान या तरुणाला अखेर अदानी समुहाने आधार दिला आहे. झीशान अली खानला अदानी समुहाच्या मुंबई कार्यालयात एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली आहे. 

एमबीए असलेल्या झीशान अली खानने काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिरे कंपनीत मार्केटिंग विभागात नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र संबंधीत कंपनीने मुस्लिम असल्याने झीशानला नोकरी नाकारली होती. तेव्हापासून झीशान चर्चेत आला असून हा प्रकार प्रसारमाध्यमांमध्ये झळकताच झीशानला अनेक कंपन्यांनी नोकरीची ऑफर दिली होती. यात झीशानने अहमदाबादच्या अदानी समुहातील नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समुह इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील मोठा समुह असल्याने ही नोकरी स्वीकारल्याचे झीशानने सांगितले. 'आम्ही जात, धर्म, वर्ण यापेक्षा उमेदवाराच्या क्षमतेवर भर देतो. झीशान हा एक चांगला उमेदवार असल्याने त्याला नोकरीची संधी दिली असे अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. 

 

Web Title: Muslim youth working in the Adani group