हिंदू मुलीवर प्रेम करणा-या "त्या" मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या
By Admin | Updated: April 8, 2017 10:41 IST2017-04-08T10:35:42+5:302017-04-08T10:41:24+5:30
प्रेमसंबंधातून एका मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हिंदू मुलीबरोबर प्रेमसंबंध ठेवले म्हणून...

हिंदू मुलीवर प्रेम करणा-या "त्या" मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या
ऑनलाइन लोकमत
गमला, दि. 8 - अल्वरमध्ये गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत मुस्लिम शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता झारखंडमध्ये प्रेमसंबंधातून एका मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हिंदू मुलीबरोबर प्रेमसंबंध ठेवले म्हणून मुस्लिम युवकाला खांबाला बांधून मरेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली.
यामध्ये मोहम्मद शालिक या 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. झारखंडच्या गमला जिल्ह्यात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. मोहम्मद त्याच्या प्रेयसीसोबत फिरताना आढळला. त्याची प्रेयसी दुस-या धर्मातील होती. त्याच रागातून मोहम्मद मारहाण झाली असे पोलीस अधिक्षक चंदन कुमार झा यांनी सांगितले. जातीय वादातून नव्हे प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे झा यांनी सांगितले.
पोलिस चौकशीत मुलीने जी माहिती दिली त्या आधारावर अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुलीच्या कुटुंबियांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यांनी मोहम्मद शालीकला मुलीपासून दूर रहाण्यास बजावले होते. शालीकने त्या धमकीकडे दुर्लक्ष केले आणि बुधवारी रात्री तो मुलीला सोडण्यासाठी तिच्या घराजवळ केला. शालीकला मुलीसोबत तिथे पाहताच स्थानिकांनी त्याला मारहाण सुरु केली.
मुलीसमोरच त्यांनी शालीकला खांबाला बांधले आणि मारहाण सुरु केली. शालीक रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी मित्रमंडळींकडे शालीकची चौकशी सुरु केली. कुटुंबिय शोधाशोध करत मुलीच्या घराजवळ पोहोचले तेव्हा तिथे त्यांना शालीक गंभीर जखमी अवस्थेत सापडला. त्यांनी त्याला लगेच गमला येथील रुग्णालयात हलवले. पण गंभीर जखमी झाल्यामुळे शालीकचा मृत्यू झाला.