शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू महिलेचा जीव वाचविण्यासाठी मुस्लिम युवकाने तोडला रमजानचा रोजा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 08:50 IST

नात्यांना जोडण्यासाठी धर्म आणि रक्ताची गरज असलीच पाहिजे असं नाही हे सिद्ध केल्याचं सांगितलं.

सोनितपूर - एकीकडे देशात हिंदू आणि मुस्लिम यामध्ये वाद निर्माण करुन धर्माच्या नावावरुन ध्रुवीकरण केले जाते. तर दुसरीकडे आसाममधील एक घटना हिंदू-मुस्लिम ऐक्याचं मोठं उदाहरण म्हणून समोर आलं आहे. रमजानचा महिना असताना रोजा तोडून एका मुस्लिम युवकाने 85 वर्षीय हिंदू महिलेला रक्तदान करुन तिचे प्राण वाचवले आहेत. या युवकाने केलेल्या कामाचं सोशल मिडीयात त्याच्यावर कौतुक होत आहे. 

माणुसकीला कोणताही धर्म नसतो हे आसाममधील या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आसाममधील सोनितपूर येथील रहिवाशी मुन्ना अन्सारी हे रमजाननिमित्त सूर्योदय ते सूर्यास्त रोजा ठेवतात. इस्लाम धर्मानुसार रोजा पाळण्याचे कडक नियम आहेत. मात्र रोजादरम्यान मुन्ना अन्सारी यांना विश्वनाथ सामान्य रुग्णालयातून आलेल्या एका कॉलमुळे त्यांनी रोजा तोडण्याचा निर्णय घेतला. विश्वनाथ जिल्ह्यातील ईटाखोला येथील रहिवाशी रेवती बोरा यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. एक आठवड्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेला बी निगेटिव्ह या रक्ताची गरज लागली. रक्तपेढीपासून नातेवाईकांपर्यंत सगळीकडे बी निगेटिव्ह हे रक्त शोधण्यासाठी धावपळ झाली मात्र कुठेही यश आलं नाही. त्यामुळे रुग्णालयाकडून मुन्ना अन्सारी यांना फोन करुन एका महिलेला बी निगेटिव्ह रक्ताची प्रचंड गरज असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर मुन्ना अन्सारी यांनी वेळ न घालवता रुग्णालयातून पोहचून त्या महिलेसाठी रक्तदान केलं. 

मागील 3 दिवसांपासून रेवती बोरा यांच्यासाठी रक्त शोधण्याचं काम त्यांचे कुटुंबीय करत होते. मात्र ऐनवेळी मुन्ना अन्सारी यांनी पुढाकार घेत केलेल्या रक्तदानामुळे बोरा कुटुंबीय भावनिक झाले. रेवती बोरा यांचा मुलगा अनिल बोरा यांच्या डोळ्यात अश्रू येत अन्सारी यांचे आभार मानले तसेच मुन्ना अन्सारी यांनी त्यांचे आईचे प्राण वाचवून नात्यांना जोडण्यासाठी धर्म आणि रक्ताची गरज असलीच पाहिजे असं नाही हे सिद्ध केल्याचं सांगितलं.  बी निगेटिव्ह हा रक्तगट खूप कमी लोकांचा असतो. त्यामुळे रेवती बोरा यांना रक्त देण्यासाठी आलेला मुन्ना अन्सारी हा बोरा कुटुंबीयांसाठी देवदूत म्हणून आल्याचं सांगितलं जातंय.  

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीMuslimमुस्लीमHinduहिंदू