शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

जन्मदर घटूनही देशातील मुस्लिम टक्का वाढला!

By admin | Updated: August 26, 2015 05:25 IST

गेली तीन दशके भारतात मुस्लिम लोकसंख्यावाढीचे प्रमाण इतर धर्मीयांच्या तुलनेने घटत असले, तरी एकूण लोकसंख्येमधील मुस्लिमांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत गेल्या

नवी दिल्ली : गेली तीन दशके भारतात मुस्लिम लोकसंख्यावाढीचे प्रमाण इतर धर्मीयांच्या तुलनेने घटत असले, तरी एकूण लोकसंख्येमधील मुस्लिमांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत गेल्या १० वर्षांत अत्यल्प वाढले आहे. तसेच देशात जनगणना सुरू झाल्यापासून गेल्या ११० वर्षांत एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण प्रथमच ८० टक्क्यांच्या खाली गेले आहे.सन २०११मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्येची जी धर्मनिहाय आकडेवारी भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर कार्यालयाने मंगळवारी जारी केली, त्यावरून हे चित्र समोर आले. ‘हम दो, उनके ग्यारह’ असे सांगत हिंदुत्ववादी संघटना देशातील मुस्लिमांची लोकसंख्या पद्धतशीरपणे वाढविण्याचे षडयंत्र राबविले जात असल्याचा प्रचार करीत असल्या तरी वस्तुस्थितीतशी नाही, हेही या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जनगणना दर १० वर्षांनी केली जाते. आकडेवारीवरून असे दिसते की, सर्वच धर्मांच्या समाजांमध्ये लोकसंख्या वाढीचे दशवार्षिक प्रमाण घटत असले तरी हिंदुंच्या तुलनेत मुस्लिमांमधील ही घट अधिक वेगाने होत आहे. गेल्या तीन दशकांमध्येही अशीच स्थिती होती. तसेच मुस्लिमांमधील जननप्रमाणही हिंदूंच्या तुलनेत अधिक प्रमाणात कमी होत असल्याचे ही आकडेवारी सांगते.असे असले तरी २००१ ते २०११ या दशकात इतर सर्व धर्मियांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण अत्यल्प घटले असले तरी फक्त मुस्लिमांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण वाढले आहे. जनगणनेच्या या ताज्या आकडेवारीनुसार,गणनेच्या १० वर्षांच्या काळात, हिंदूंचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.७ टक्क्यांनी, शिखांचे ०.२ टक्क्यांनी व बौद्धांचे ०.१ टक्क्याने घटले आहे. याउलट मुस्लिमांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.८ टक्क्याने वाढले आहे. ख्रिश्चन आणि जैन धर्मियांच्या या प्रमाणात फारसा फरक पडलेला नाही.सन २०११मध्ये देशाची एकूण लोकसंख्या १२१.०९ कोटी होती. त्यात हिंदूचे प्रमाण ७९.८ टक्के होते. गेल्या १० वर्षांत हिंदूंचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.७ टक्क्याने कमी झाल्याने देशात हिंदूंची टक्केवारी प्रथमच ८० टक्क्यांच्या खाली गेली आहे.याआधीही सरकार जनगणनेतील अशी धर्मनिहाय आकडेवारी जाहीर करीत असे. आता मात्र जनगणनेनंतर चार वर्षांनी व बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही आकडेवारी जाहीर करण्याच्या मोदी सरकारच्या हेतूबद्दल अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.बिहारमध्ये एकूण २४३ पैकी किमान ५० मतदारसंघांत निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडू शकेल एवढी मुस्लिम लोकसंख्या आहे. २००१ च्या जनगणनेतील आकडेवोरीवरून मुस्लिमांची लोकसंख्या तुलनेने अधिक दराने वाढत असल्याचे चित्र समोर आल्याने मोठा वाद झाला होता. वस्तुत: तशी स्थिती नव्हती. कारण ज्या १९९१च्या जनगणनेशी तुलना केली गेली त्यावेळी फुटीरवादी कारवायांच्या अशांत वातावरणामुळे मुस्लिम बहुल जम्मू-काश्मीरमध्ये शिरगणती केली नव्हती.(लोकमत न्यूज नेटवर्क)लोकसंख्येचे धर्मनिहाय चित्रधर्म प्रमाण (टक्के)हिंदू ७९.८मुस्लीम १४.२ख्रिश्चन २.३शीख १.७बौद्ध ०.७जैन ०.४इतर ०.७धर्म न सांगणारे ०.२धर्मनिहाय लोकसंख्या वाढधर्म प्रमाण हिंदू १६.८ टक्केमुस्लिम २४.६ टक्केख्रिश्चन १५.५ टक्केशिख ८.४ टक्केबौद्ध ६.१ टक्केजौन ५.४ टक्के१७.७ टक्के दशकातील एकूण वाढ